Kolhapur News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये देखील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अशातच, भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराजांवर वादग्रस्त विधान केले आहे.
त्यामुळे कोल्हापूरचे राजकारण आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खरेतर कोल्हापूरच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. या लोकसभा निवडणुकीत देखील कोल्हापूर कडे संपूर्ण देशाचे लक्ष राहणार आहे.
यंदा कोल्हापूरमधून महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे. दुसरीकडे महायुतीने या जागेवर भाजपाचा उमेदवार उतरवला आहे. भाजपाने 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना संधी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
यानुसार सध्या भाजपा खासदार संजय मंडलिक यांनी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी एका प्रचार सभेत बोलताना एक मोठं वादग्रस्त विधान केले आहे.
यामुळे आगामी काळात कोल्हापूरचे राजकारण आणखी ढवळून निघणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मंडलिक यांनी चंदगड तालुक्यातील नेसरी या ठिकाणी एक प्रचार सभा घेतली. या सभेला संबोधित करताना मंडलिक यांची मात्र जीभ घसरली.
मंडलिक यांनी या प्रचार सभेत बोलताना ‘आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता खरी वारसदार आहेत.
माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. मल्लाला हातचं मारायचा नाही. मल्लाला टांग मारायची नाही. मग कुस्ती होणार कशी ? असं विधान यावेळी मंडलिक यांनी केले आहे.
यामुळे संजय मंडलिक यांच्या या विधानावरून आगामी काळात राजकारण मोठ्या प्रमाणात तापण्याची शक्यता आहे. तसेच या विधानावर छत्रपती शाहू महाराज काय प्रतिक्रिया देतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.