विधानसभा निवडणूक

Lok Sabha Election 2024: नगर दक्षिणचे लोकसभेचे मैदान भाजप गाजवणार की अजित पवारांची राष्ट्रवादी? डॉ. सुजय विखेंचा पत्ता होणार कट?

Published by
Ajay Patil

Lok Sabha Election 2024:- संपूर्ण देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असल्याचे सध्या स्थिती असून महाराष्ट्रामध्ये महायुतीत आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये जागा वाटपाबाबतचा तिढा अद्याप देखील कायम आहे. महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत मॅरेथॉन बैठका सध्या सुरू असून या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र मध्ये  येऊन भाजपचे मित्र पक्ष असलेले शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यासोबत बैठक देखील घेतली.

परंतु अद्याप पर्यंत मात्र यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही. साधारणपणे 11 तारखेपर्यंत यासंबंधीचा तिढा सुटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशीच परिस्थिती सध्या महाविकास आघाडीमध्ये देखील दिसून येत असून यामध्ये ठाकरे गट तसेच काँग्रेस व शरद पवार गट यांच्यामध्ये देखील काही जागांसाठी तिढा कायम आहे

व त्यात त्यात वंचित बहुजन आघाडी संदर्भात देखील एक मताने निर्णय अजून तरी होऊ शकलेला नाही. या सगळ्या जागा वाटपात असलेल्या तिढ्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ नेमका भाजपकडे जातो की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार यांच्याकडे याबाबत संभ्रम मात्र कायम आहे.

 नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे जाणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे?

सध्या महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत अद्याप पर्यंत समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे नगर जिल्ह्यात असलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचे वातावरण असून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ पाहिला तर आतापर्यंत भाजपकडेच राहिलेला आहे.

परंतु आता नवीन राजकीय समीकरणांनुसार महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट सहभागी असल्यामुळे त्यांनी देखील या जागेवर दावा केला आहे. जर आपण या ठिकाणाच्या काही मागील निवडणुकांचा विचार केला तर यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत झालेली आहे.

त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद देखील या ठिकाणी असल्याचे बोलले जाते. सध्या या ठिकाणी भाजपचे विद्यमान खासदार असून पक्षाचा दबदबा देखील कायम आहे असे देखील म्हटले जाते. या सगळ्या गोंधळातील परिस्थितीमुळे दक्षिण नगरची जागा महायुतीतील घटक पक्षांचे जे काही वरिष्ठ आहेत त्यांचे डोकेदुखी वाढवेल हे मात्र निश्चित.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून भाजपचा उमेदवार मैदानात उतरेल की राष्ट्रवादी काँग्रेसचा हे आता एक दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

 नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीलाच मिळणार?

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचा दावा या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केला असून मोबाईलवर व्हाट्सअप स्टेटस ठेवत त्यांनी याबाबतची माहिती मुंबई येथील पत्रकार परिषदेत दिल्याचे बोलले जात आहे

व या स्टेटस वरील माहितीनुसार पाहिले तर नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून नुकतीच अमित शहा यांच्यासोबत दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतचा अहवाल दिला असल्याची माहिती गायकवाड यांनी दिल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये आता चर्चांना उधाण आले आहे.

 नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असण्यामागे निलेश लंके हे प्रमुख कारण?

महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगर दक्षिण मतदार संघातून आ. निलेश लंके यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सध्या सुरू असल्यामुळे व त्याबाबत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्य म्हणजे शरद पवारच आग्रही असल्याचे बोलले जात आहे. सध्या जरी निलेश लंके  अजित पवार गटासोबत आहेत असे सांगितले जात आहे.

परंतु ते कुठल्याही क्षणी शरद पवार यांच्याबरोबर जाऊन नगर दक्षिणेतून तुतारी हातात घेऊ शकतात असे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चर्चा आहेत. सध्या जर आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या तर या चर्चा आहेतच परंतु यामध्ये अजून तरी स्पष्टता नाही. परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही सगळी राजकीय समीकरणे स्पष्ट होतील.

 भाजप विद्यमान खासदारांचे कापणार तिकीट?

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यावेळेस या वेळेस 12 विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याच्या बातम्या देखील काही दिवसांपासून माध्यमांमधून झळकत असल्याचे आपण पाहत आहोत. या बारा जणांच्या यादीमध्ये नगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे देखील नाव आहे.

जर त्यांचे तिकीट भाजपचे नाकारले तर भाजपकडून कुठला उमेदवार असणार हा एक एक मोठा प्रश्न आहे. सुजय विखे यांचे तिकीट कापून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची प्लानिंग तर नाही ना असे देखील शंका या ठिकाणाहून उपस्थित केली जात आहे.

कारण या ठिकाणाहून या अगोदर भाजपने दोनदा विद्यमान खासदारांचे तिकीट कापले होते व त्या ठिकाणी दुसरे उमेदवार दिले होते. परंतु भाजपला अपयश हाती आले होते. परंतु मागच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या माध्यमातून भाजपला विजय मिळवता येणे शक्य झाले होते. परंतु या सगळ्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत. येणाऱ्या एक दोन दिवसात या संबंधीचे चित्र स्पष्ट होईलच यात मात्र शंका नाही.

Ajay Patil