विधानसभा निवडणूक

भाजपची दुसरी लिस्ट आली ! खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर

Published by
Tejas B Shelar

Loksabha Election BJP Candidate Second List : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे आता लोकशाहीचा महा कुंभ सजणार आहे. अर्थातच 18 व्या लोकसभेसाठी आता निवडणुकांची घोषणा होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी खासदारकीच्या निवडणुकीची घोषणा करू शकते. दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्याच दिवसापासून देशभरात आचारसंहिता देखील लागू होणार आहे.

अशा परिस्थितीत, राजकीय पक्षांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीत कोणाला तिकीट दिले पाहिजे यासाठी जोरदार मंथन केले जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने देखील आपली पहिली यादी जाहीर केलीय. मात्र, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते.

याचे कारण म्हणजे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून फॉर्म्युला ठरत नव्हता. मध्यंतरी महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट यामध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे जागावाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौरा देखील केला होता.

यावेळी अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत महायुतीच्या जागा वाटपावर मंथन केले होते. परंतु, अमित शहा यांच्या समवेत झालेल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित होऊ शकला नाही. यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते.

आता मात्र महायुतीमधील हा गदारोळ संपला असून जागा वाटपाचा तिढा निकाली काढण्यात आला आहे. महायुतीमधील जागा वाटपाचे समीकरण आता जवळपास निश्चित झाले आहे. कारण की, भारतीय जनता पक्षाने आज आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील उमेदवारांचा देखील समावेश केलेला आहे. अशा परिस्थितीत, आता आपण राज्यातील कोणकोणत्या जागांवर भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत ? कोणाचा पत्ता कट झाला आहे हे थोडक्यात पाहणार आहोत.

  • नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ : डॉक्टर सुजय विखे पाटील
  • बीड : पंकजा मुंडे
  • लातूर : सुधाकर तुकाराम शृंगारे
  • माढा : रणजितसिन्हा हिंदुराव नाईक निंबाळकर
  • सांगली : संजय काका पाटील
  • नंदुरबार : हिना विनयकुमार गावित
  • धुळे : डॉक्टर सुभाष रामराव भामरे
  • जळगाव : श्रीमती स्मिता वाघ
  • रावेर : श्रीमती रक्षा निखिल खडसे
  • अकोला : श्री अनुप धोत्रे
  • वर्धा : रामदास चंद्रभानजी तडस
  • नागपूर : श्री नितीन जयराम गडकरी
  • चंद्रपूर : श्री सुधीर मुनगंटीवार
  • नांदेड : श्री प्रतापराव पाटील चिखलीकर
  • जालना : श्री रावसाहेब दादाराव दानवे
  • दिंडोरी : भारती प्रवीण पवार
  • भिवंडी : श्री कपिल मोरेश्वर पाटील
  • मुंबई उत्तर पूर्व : मिहीर कोटेचा
  • पुणे : श्री मुरलीधर किशन मोहोळ
  • मुंबई उत्तर : श्री पियुष गोयल
Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com