Maharashtra Lok Sabha Opinion Poll : सध्या संपूर्ण देशभरात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकते. आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत, आता राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवारांची नावे फायनल करून लवकरात लवकर याची अधिकृत यादी जाहीर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, नुकत्याच दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.
यात मात्र महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे समाविष्ट नव्हती. विशेष म्हणजे इतरही पक्षांच्या माध्यमातून आता उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. अशातच, मात्र काही ओपिनियन पोल देखील समोर येऊ लागले आहेत.
इंडिया टीव्ही-सीएनएक्स असाच एक ओपिनियन पोल समोर आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 जागांवर कोणत्या पक्षाचा विजय होणार ? याबाबत देखील सर्वेक्षण करण्यात आले आहे.
यामध्ये बीजेपी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, उबाठा शिवसेना यांना किती जागा मिळणार ? याबाबत एक अंदाज बांधला गेला आहे.
म्हणजेच कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा खासदार निवडून येऊ शकतो याबाबत या ओपिनियन पोल मध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून आता आपण हेच सर्वेक्षण थोडक्यात पाहणार आहोत.
कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा खासदार
नंदूरबार -भाजप
धुळे – भाजप
जळगाव -भाजप
दिंडोरी -भाजप
नाशिक – उबाठा शिवसेना
बुलढाणा – शिवसेना
अकोला – भाजप
अमरावती – भाजप
वर्धा – भाजप
रामटेक – काँग्रेस
नागपूर – भाजप
भंडारा-गोंदिया – भाजप
गडचिरोली चिमूर -भाजप
चंद्रपूर – भाजप
यवतमाळ वाशिम – शिवसेना
हिंगोली – काँग्रेस
नांदेड – भाजप
परभणी – उबाठा शिवसेना
जालना – भाजप
छत्रपती संभाजीनगर – उबाठा शिवसेना
धाराशिव – उबाठा शिवसेना
लातूर – भाजप
बीड – भाजप
मुंबई उत्तर – भाजप
मुंबई उत्तर पश्चिम – शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व – भाजप
मुंबई उत्तर मध्य – भाजप
मुंबई दक्षिण मध्य – शिवसेना
मुंबई दक्षिण – उबाठा शिवसेना
पालघर – भाजप
भिवंडी – भाजप
कल्याण – शिवसेना
ठाणे – शिवसेना
रायगड – राष्ट्रवादी काँग्रेस
मावळ – राष्ट्रवादी काँग्रेस
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – उबाठा शिवसेना
पुणे – भाजप
बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस
शिरूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
अहमदनगर – भाजप
शिर्डी – उबाठा शिवसेना
सोलापूर – भाजप
माढा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
सांगली – भाजप
सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस
हातकणंगले – उबाठा शिवसेना
अर्थातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील तीन उमेदवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पक्षातील आठ उमेदवार, काँग्रेसचे दोन असे महाविकास आघाडीचे 13 उमेदवार आगामी निवडणुकीत जिंकू शकतात असा अंदाज बांधला गेला आहे.
तसेच महायुती मधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सहा उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा यांच्या गटातील चार उमेदवार आणि भाजपाचे 25 उमेदवार आगामी लोकसभेत विजयी होऊ शकतात असा अंदाज या ओपिनियन पोल मध्ये बांधला गेला आहे. तथापि हा ओपिनियन पोल आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच योग्य ती स्पष्टोक्ती येणार आहे.