Maharashtra Politics : काही करा पण शरद पवारांना घेरा ? बारामतीचा गड राखण्यासाठी आता मोदी फडणवीसांची ‘ही’ चाणक्यनीती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळलेले जनतेने पहिले. कधी नव्हे ते इतके पक्ष फुटणे, पक्षांतर होणे आदी गोष्टी महाराष्ट्राला दिसल्या. यामध्ये भाजपची भूमिका ही आपला पक्ष स्ट्रॉंग करण्याची व सत्ता राखण्याची होती. दरम्यान सर्व मोठे पक्ष फोडले असले तरी महाराष्ट्रात अद्यापही शरद पवार यांची मोठी राजकीय क्रेझ दिसून येते. आताच्याही निवडणुकीत त्यांची मोठी क्रेझ दिसेल असे सांगितले जाते.

त्यामुळे आता भाजपकडून शरद पवार यांना घेरण्याचे सर्व प्रयोग होताना दिसतात. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा लढा महायुतीने लावला आहे.

त्यामुळे शरद पवार यांना बारामतीमध्येच लढाईस गुंतून पडावे लागेल असे यामागचे गणित असावे. दरम्यान आता कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याचा ध्यास केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने घेतलाय.

ही लढत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी होणार आहे. मागील पंचवार्षिकमध्ये २०१९ मध्ये देखील भाजपने ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती जिंकण्याचा संकल्प केला यात ते अमेठीत सक्सेस झाले पण बारामतीत मात्र भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा खासदार सुळे यांनी मोठा पराभव केला. आता मात्र बारामती जिंकायचीच अशी पूर्ण तयारीच जणू भाजपने केली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेत सुनेत्रा पवार उमेदवारी देत राजकीय डाव आखण्यात आला.

बारामतीत महायुतीचा झेंडा फडकाविण्यासाठी भाजपसह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी जंग पछाडले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह केंद्रातील मंत्रीही आले. असे असले तरी आता बारामतीमध्ये शरद पवार यांचे पारडे जड होऊ शकते याची कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आल्याने त्यांनी आता बारामती लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणून त्यांची सभा आयोजित करण्याचे नियोजन केले असल्याचे बोलले जात आहे.

 बारामतीसाठी नवीन डाव
बारामतीमध्ये शरद पवार यांचे पारडे जड होऊ शकते याची कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आल्याने त्यांनी आता बारामती लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणून त्यांची सभा आयोजित करण्याचे नियोजन केले असल्याचे बोलले जात आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होऊ शकते. ही सभा बारामतीसह पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या शिरूर,मावळ, पुणे शहर या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी एकत्रित असणार आहे असेही म्हटले जात आहे. त्यामुळे आता काही करा पण शरद पवारांना घेरा हे ध्येय भाजपने ठेवले असून त्यासाठी पंतप्रधान मोदी यांची सभा ठेवण्याचा डाव भाजपने आखला असल्याचे बोलले जात आहे.