विधानसभा निवडणूक

Maharashtra Politics : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 25 प्लस जागा ! त्यात बारामतीचीही जागा असणार, शरद पवार यांचे राजकीय भाकीत

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी चांगलीच रंगलीय. यात भाजप ४५ प्लस जागा निवडून येईल असे आत्मविश्वासाने सांगत आहे. दरम्यान आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपले राजकीय भाकीत वर्तवले आहे.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत जे काही सर्व्हे झाले आहेत त्यामध्ये जनमत इंडिया आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसते. महाराष्ट्राचा विचार केला तर महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे. आघाडीलाच जनमताचा फायदा होईल.

राज्यात महाविकास आघाडीला 25 पेक्षा जास्त जागेंवर विजय मिळू शकतो असे ते म्हणाले. 2019 मध्ये महाराष्ट्रात आघाडी सहा जागावर विजयी झाली. यात राष्ट्रवादीला चार, एक जागा काँग्रेस आणि एका जागेवर अपक्ष असे सहा खासदार निवडून आले होते.

यंदा मात्र महाविकास आघाडी एकत्र असल्याने तिप्पटीपेक्षा जास्त जागांवर आम्ही विजयी होऊ असे पवार म्हणाले. महाराष्ट्रात 48 जागांपैकी 25 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे स्वप्न भांगणार !
भाजपने देशात 400 पारचा नारा दिला असून त्यात महाराष्ट्रात 45 प्लस जागा येतील असे म्हटले आहे. परंतु त्यांचे हे स्वप्न भंगणार आहे असे सर्व्हेमधून स्पष्ट होतेय. महाविकास आघाडीला 25 पेक्षा जास्त जागा मिळतील. जनतेला लोकशाही हवी असल्याने जनता मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त करेल असेही पवार म्हणाले.

Ahmednagarlive24 Office