Maharashtra Politics : महाराष्ट्रात लोकसभेच्या लढतीने रंगत आणली आहे. महाराष्ट्रातील काही लढती अत्यंत लक्षवेधी ठरणार आहेत. या लक्षवेधी जागा अगदी उमेदवार ठरण्यापासून रंगात आहेत. यातील एक महत्वाची जागा म्हणजे साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे यांची जागा.
त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. परंतु त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून कोणता उमेदवार उभा राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले होते. खा. श्रीनिवास पाटील यांनी या निडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता शरद पवार नेमका कोणता पत्ता बाहेर काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आता शरद पवार यांनी साताऱ्यात विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा लाव्कर्ह केली जाईल अशी माहिती मिळाली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप कोणताच उमेदवार दिलेला नाही. भाजपने या ठिकाणी उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही. परंतु त्यांनाच तिकीट मिळेल असे सांगितले जात आहे. त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे तसेच प्रचारही सुरु केला अशे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजेंच्या विरोधात तुल्यबळ व तगडा उमेदवार कोणता उभा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अखेर शरद पवार यांनी चार इच्छुकांमध्ये विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन ‘कोण लढणार पहा , नाहीतर मी आहे’, असे म्हटले होते. त्यानुसार शरद पवार यांनी अखेर आपले लढवय्ये शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केल्याचे बोलले जात आहे.
लढत लक्षवेधी होणार
साताऱ्याची ही लढत लक्षवेधी होईल असे चित्र आहे. येथे भाजपकडून उभे असणारे उदयनराजे हे अत्यंत लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आहे. परंतु त्यांचा मागीलवेळी शरद पवार यांच्या उमेदवाराने पराभव केला होता. आता यावेळी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार.