विधानसभा निवडणूक

राज्यात महायुती की महाविकास आघाडी ? सट्टा बाजाराची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी आली? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

नुकतेच लोकसभेसाठी मतदान सर्वत्र पार पडले. आता उद्या १ जून ला शेवटचा मतदान टप्पा पार पडेल. यावेळी महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांवरील सामने फारच चर्चेचे विषय झाले. याचे कारण म्हणजे पक्षातील फुटाफुटी, बदललेली राजकीय समीकरणे आणि नेमके कुठे काय होईल याचा अचूक अंदाज न आल्याने सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे.

आता अशातच काही आश्चर्यचकित करणारी आकडेमोड समोर आलीये. महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसणार असल्याचे सांगितले जात असून त्यांना फक्त २८ जागांवरच विजय मिळणार, असा अंदाज सट्टा बाजाराने वर्तवला असल्याचे चर्चिले जात आहे.

२०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीने एकूण ४१ जागा जिंकल्या होत्या. परंतु यंदा मात्र त्यांचे १४ जागांचे नुकसान होईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीला होईल शिवाय उद्धव ठाकरे हे आघाडीसोबत असल्याने त्यांना २० जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज सट्टाबाजाराने वर्तवला असल्याचे सांगितले जात आहे.

कोठून कुणाला विजयाची खात्री?
सट्टा बाजाराने मतदारसंघानिहाय उमेदवारांच्या विजयाचा देखील अंदाज बांधला असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेनुसार नागपुरातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी, चंद्रपूरमधून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर, यवतमाळ-वाशीम येथे उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेचे संजय देशमुख,

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विजयी होतील असा अंदाज सट्टा बाजाराने वर्तवला आहे असे म्हटले जात आहे. अमरावतीतून नवनीत राणा यांना धक्का बसण्यची चिन्हे आहेत तर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पीयूष गोयल यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती विजयी होण्याची दाट शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

सूचना : सट्टा बाजाराचे मूल्यांकन परिणाम किती खरे आणि बरोबर असतील याबाबत खात्री देता येत नाही. त्याची आकडेवारी कोणत्याही सर्वेक्षणातून किंवा सर्वेक्षणातून घेतलेली नाही.

 

 

Ahmednagarlive24 Office