विधानसभा निवडणूक

‘नो लंके ओन्ली विखे.. ! विखेंची मुळे इतकी रोवली आहेत की ते कुणीच उखडून टाकू शकत नाही,’ खा. विखेंची अर्ज भरण्याची रॅली मुख्यमंत्री शिंदेंनी गाजविली,पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Loksabha : अहमदनगरमध्ये सुजय विखे हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार आहेत. आज (दि.२२ एप्रिल) महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी खा. सुजय विखे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शहरातून रॅली काढली.

त्यानंतर शहरात छोटेखानी सभा पार पडली. यावेळी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. मोनिका राजळे, आ. राम शिंदे आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

काय म्हणाले मुख्यंमत्री
एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, आज इतक्या उन्हामध्ये हजारो कार्यकर्ते इथे जमले आहात. यावरूनच सुजयचा विजय पक्का आहे हे समजते. सुजय विखे यांनी लोकसभेत अनेक प्रश्न मांडले आहेत. विकासकामे केली आहेत. त्यांच्या घराला मोठा वारसा आहे.

त्यांच्या आजोबांचा सहकाराचा वारसा सुजय विखे चालवत आहेत असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, सुखदुःखात धावून जाण्याचे काम सुजय विखे करतात.

सर्व प्रश्नांनाची जाण त्यांना आहे. अहमदनगरची लोक सुसंस्कृत लोकांच्या मागे उभी राहतात हा इतिहास आहे. त्यामुळे आता सुजय विखे यांचे लीड वाढवायचे काम सर्वानी करा असे आवाहन त्यांनी केले.

लंके यांच्यावर नाव घेता टीका
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आपणा सर्वाना मिळून विरोधकांच्या लंकेचं दहन करायचंय. उद्या हनुमान जयंतीला हाच संकल्प करा. नो लंके ओन्ली विखे असे म्हणत ते म्हणाले की, विखेंची मुळे इतकी घट्ट रोवली आहेत की महाविकास आघाडीचे वरून जरी कुणी आले तरी ते उखडून टाकू शकत नाहीत अशी टोला त्याची लगावला.

राहुल गांधी यांच्यावर टीका
लोकांचा मोदी गॅरंटीवर विश्वास आहे. मोदींनी अवघ्या काही वर्षात चांद्रयान लँड केले पण ५० वर्षांत राहुल गांधी स्वतःला लॉन्चिंग करू शकले नाही..राहुल गांधी पंतप्रधान स्वप्नातही होऊ शकत नाहीत. देशाला फक्त नरेंद्र मोदी हेच उंचीवर नेऊन ठेऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ahmednagarlive24 Office