Ahmednagar News : देशामध्ये मोदी आणि योगी यांच्या कणखर भूमिकेमुळेच हिंदू धर्माचे रक्षण होत आहे. पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपल्यालाही मागे राहून चालणार नाही. धर्म आणि राष्ट्र हिताकरीता प्रत्येकाने योगदान देण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रबोधनकार संग्राम महराज भंडारे यांनी केले.
सकल हिंदू समाजाच्या वतीने माळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रहित सर्वपरी या विषयावरील कार्यक्रमात भंडारे यांनी लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, बळजबरीने होत असलेल्या धर्मातराच्या घटनांची उदाहरण देवून हिंदू धर्माच्या विरोधात जाणीवपूर्वक करण्यात येत असलेल्या षडयंत्राच्या विरोधात एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले.
देशावर अतिरेक्यांकडून होणारे हल्ले २०१४ नंतर बंद झाले याचे एकमेव कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली कणखर भूमिका. जम्मू कश्मिरमध्ये असलेले ३७० कलम हटवले. आयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदीराचे झालेले निर्माण ही कोट्यावधी हिंदूच्या अपेक्षांची पूर्ती ठरली असल्याचे संग्राम भंडारे म्हणाले.
आज हिंदू धर्माला जाणीवपूर्वक लक्ष बनवले जात आहे, याचे कारण फक्त सहनशीलता. पण आता अन्याय सहन करीत बसण्यापेक्षा आवाज उठविण्याची गरज आहे. सोशल मिडीयावर व्यक्त होण्यापेक्षा आता हिंदूनी संघटितपणे उभे राहाण्याची आवश्यकता आहे.
पंतप्रधान मोदी आता विश्वनेते म्हणून ओळखले जातात, अनेक देशाचे राष्ट्राध्यक्ष मोदींचा शब्द आता प्रमाण मानतात. एवढे कणखर नेतृत्व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना आपणच घरात बसून चालणार नाही. हिंदू धर्माच्या हितासाठी काम करणा-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याचे कर्तव्य आपल्या सर्वांना बजवावे लागणार असल्याचे भंडारे यांनी सांगितले.
आज लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. लोकशाही मानणारे आपण आहोत. एका एका मताचे महत्व खूप मोठे आहे. सर्वाधिक मतदान कसे मोदींना कसे होईल याचा विचार आपण करावा असे आवाहन करून प्रत्येक मत राष्ट्रहितासाठी महत्वाचे ठरणार असल्याचे भंडारे यांनी सांगितले.