मोठी बातमी, राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना पाठींबा, पण लोकसभेच्या किती जागा लढणार ? काय म्हटलेत राज

Tejas B Shelar
Published:
Raj Thackeray News

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनी या मेळाव्यात मनसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. या मेळाव्यात मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे यामुळे तुम्ही या असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार आज हा मेळावा संपन्न झाला आहे.

या मेळाव्यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकी कुणाच्या बाजूने उभी राहणार, पक्षाची भूमिका नेमकी काय आहे, लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा आणि विधानसभा निवडणुकीत पक्ष काय निर्णय घेऊ शकतो याबाबत सविस्तर अशी माहिती दिलेली आहे.

काय म्हटलेत राज

या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ‘या महाराष्ट्रातून पुढे जाताना आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्या महाराष्ट्र सैनिकांवर विश्वास आहे. आपण योग्य मार्ग दाखवू. माझी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. मतदारांकडूनही अपेक्षा आहे.

कृपा करून व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत, असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी पुढे बोलताना, आजच्या परिस्थितीत मी पाहतो. तेव्हा पुढच्या ५० वर्षाचा विषय़ करायचा असतो. पण मी बसलो तेव्हा सीएम आणि फडणवीस यांच्याशी बोललो.

म्हटलं वाटाघाटीत पाडू नका. मी तुम्हाला आज सांगतो. राज्यसभा नको आणि विधान परिषद नको. पण या देशाला चांगल्या नेत्याची गरज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहे. मला काही अपेक्षा नाही, असं म्हणतं त्यांनी मनसे भाजप, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.

अर्थातच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महायुतीला पाठिंबा देणार आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.

यावरून लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुती यांच्यात काहीतरी मोठी डील झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना फारसा इंटरेस्ट नसल्याचे यावरून दिसत आहे. कारण की लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

दरम्यान राजकीय विश्लेषकांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीला कामाला लागा असे म्हटले असल्याने लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महायुतीत सामील होऊ शकतात असे संकेत मिळत असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचे विशेष लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe