1 मे रोजी संभाजी ब्रिगेडचा नगरला मेळावा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण जिल्ह्याचा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा दि. 1 मे रोजी नगर येथे होत असून महासिचव सौरभ खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयेजन करण्यात आले असल्याची

माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी दिली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेडने बिनशर्त पाठिंबा दिला असून त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अतिशय महत्त्वाचा म्हणून होणार आहे.

दि.1 मे रोजी येथील माऊली सभागृहामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे परकाळे यानी सांगितले. लोकशाहीच्या दृष्टीने व लोकशाहीसाठी वाचविण्याच्या दृष्टीने ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.

काल मोदी हे ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आज ते मोदी बरोबर आहेत. मोदी ज्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते आज त्यांचीशी हस्तांदोलन करत आहे. देशात वाढणारी महागाई, देशात वाढणारी बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या प्रश्नासह कांदा,

दूध, सोयाबीन, कपाशी कशाला भाव मिळत नाही. गॅस, डाळी महागल्यात. वीज बिले वाढली, भ्रष्टाचार वाढलाय याबाबत पंतप्रधान बोलत नाही. हे चित्र बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे परकाळे म्हणाले.

1 मे रोजी सकाळी 11 वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला जिल्हाभरातून पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, जामखेड राहुरी या ठिकाणावरुन कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत,

शरद जोशी, निलेश बोरुडे, इंजी.शाम जरे, डॉ राहुल देशमुख, अचुत गाडे, बंटीभाऊ भिंगारदिवे, अंकुश जगताप, सुदामराव कोरडे, सचिन काकडे, दत्ता भोसले, निलेश तनपुरे, राजेंद्र काटकर, ॲड सावंत, राजेन्द्र खोजे, गणेश ताकटे, लक्ष्मण गायके, अवि मेढे, अवि ठांणगे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe