संजय राऊतांच्या अहमदनगरमधील वक्तव्याने गरमागरमी ! थेट मोदींच्या जीविताला धोका? राऊतांच्या अडचणी वाढल्या

Ahmednagarlive24 office
Published:
sanjay raut

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ही वक्तव्ये त्यांच्या अडचणी वाढवत आलेल्या आहेत. आता त्यांनी अहमदनगरमधील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

या वक्तव्याने आता त्यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. अहमदनगरमधील सभेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय तीव्र शब्दात टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याने राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश भाजपने निवडणूक आयोगासह मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार केली

असून भाजप नेत्यांकडून अमरावती, मुंबई, बीडसह राज्यात विविध ठिकाणी संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केलेली आहे.

संजय राऊत यांचे नेमके वक्तव्य काय व भाजपची तक्रार काय ?
संजय राऊत यांनी अहमदनगर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना दफन करणार असल्याची भाषा वापरली होती. ही एक धमकी असून याने सामाजिक तेढ निर्माण होऊ शकतो असे भाजपने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवितास धोका असल्याचा उल्लेख देखील या तक्रारीत केलाय.

भाजपने पत्रात म्हटले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब टाकरे गट) नेते संजय राऊत हे अहमदनगर येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा जो प्रयत्न राऊत यांनी केलाय किंवा ती जी वक्तव्ये केलीयेत ते दिशाभूल करणारे व फूट पडणारे असल्याचे सांगत

या वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची व निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा देखील भाजपने केलाय.

पंतप्रधानांच्या जीवितास धोका?
भाजपने दिलेल्या या पत्रात असेही म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या विरोधातील राऊतांचे हे विधान मुक्त व निष्पक्ष निवडणुकांच्या तत्त्वांच्या विरोधात असून यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या या विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उच्च मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होते असा दावाही केलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe