विधानसभा निवडणूक

शरद पवार ठरणार किंगमेकर, NDA मधील ‘ते’ पक्ष इंडिया आघाडीसोबत आणण्यासाठी हालचाली सुरु..

Published by
Ahmednagarlive24 Office

सर्वांचे लक्ष लागून असलेली लोकसभेची मतमोजणी सध्या सुरु आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार काही ट्रेन्स समोर येत आहे. तस पाहिले तर अधिकृत निकाल यायला अद्याप वेळ असला व अंतिम क्षणी काही होण्याची शक्यता असली तरी सध्या हाती आलेल्या ट्रेन्डनुसार भाजपाचा 400 पारचा नारा फोल ठरला असून त्यांना 300 पर्यंत जाणेही अवघड होत आहे.

सध्या इंडिया आघाडी देखील 250 जागेंच्या आसपास गेलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीकडून देखील सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. आता यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे किंगमेकर ठरणार का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग ज्यापद्धतीने केला होता तसा प्रयोग ते देशात करणार का याकडे लक्ष लागले आहे. कारण त्यांनी सध्या जो निकाल आहे तो सत्ता परिवर्तनास पोषक असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सध्या NDA सोबत असणाऱ्या नितीश कुमार यांच्या जेडीयूशी संपर्क केला असल्याचे समजते. तसेच स्वतः काँग्रेसही नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीशी संपर्क साधेल अशी माहिती समजली आहे.

भाजपाप्रणीत एनडीएचा आकडा अनेक तासांपासून 290 च्या आसपास घुटमळत असल्याने व काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी 234 पर्यंत गेली असल्याने अनेक हालचाली होऊ शकतात. भाजपा 244 जागांवर तर काँग्रेस 95 जागांवर सध्या पुढे असून इंडिया आघाडीचे जे आकडे वाढलेत, त्यामुळे त्यांच्याकडून सरकार स्थापनेचा दावा केला जासू शकतो असेही म्हटले जात आहे.

सरकार बनवण्याच्या इंचिया आघाडीच्या हालचाली
नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू दोघेही भाजपाप्रणीत एनडीएमध्ये असल्याने त्यांना एलकडे घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असून शरद पवार देखील प्रयत्नशील असल्याचे समजते. नितीश कुमार यांना उपपंतप्रधान बनवण्याची ऑर देखील दिली असल्याचे समजते.

नितीश कुमार यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता ते कधीही पलटी मारु शकतात हे पाहता मीडियाकडून जेडीयूला काँग्रेसकडे जाणार का? अशी विचारणा केल्यावर जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी आम्ही कुठेही जाणार नाही, जिथे आहोत तिथेच राहणार आहोत असं सांगितलं आहे.

Ahmednagarlive24 Office