सध्या लोकसभेचा बिगुल वाजला आहे. दरम्यान महाराष्ट्रात घराणेशाहीवरुन मोठा वाद सुरु झाला आहे. भाजप सातत्याने काँग्रेसवर घराणेशाहीवरुन टीका करत असते. यांमध्ये यावरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. त्यामुळे आता आपण एक नजर घराणेशाहीतील उमेदवारांवर टाकुयात..
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आजवर (दि.१२ एप्रिल) जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख पक्षांच्या ८६ पैकी २९ उमेदवार प्रस्थापित नेत्यांचे पुत्र, कन्या, पुतणे, सुना, भाऊ आहेत. घराणेशाहीवर सर्वाधिक टीका करणाऱ्या भाजपचे ११, उद्धवसेनेचे ७ तर काँग्रेस आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी ४ उमेदवार आहेत.
भाजप :
पंकजा मुंडे, बीड – दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या कन्या
उदयनराजे भोसले, सातारा – मा. आमदार अभयसिंहराजेंचे पुतणे
रणजितसिंह निंबाळकर, माढा – माजी खा. हिंदुराव निंबाळकरांचे पुत्र
अनुप धोत्रे, अकोला – खा. संजय धोत्रेचे पुत्र
नवनीत राणा, अमरावती – आ. रवी राणांच्या पत्नी
डॉ. सुजय विखे, अहमदनगर – महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंचे पुत्र
डॉ. भारती पवार, दिंडोरी – माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा
स्मिता वाघ, जळगाव – वडील पंचायत समिती सभापती
डॉ. हिना गावित, नंदुरबार – मंत्री डॉ. विजयकुमार गावितांच्या कन्या
रक्षा खडसे, रावेर – माजी मंत्री, आ. एकनाथ खडसेंच्या सून
डॉ. सुभाष भामरे, नंदुरबार – माजी आ. गोजरताई भामरेंचे पुत्र
शिंदेसेना :
संजय मंडलिक, कोल्हापूर – दिवंगत माजी खा. सदाशिव मंडलिकांचे पुत्र
धैर्यशील माने, हातकणंगले – मा. खा. निवेदिता मानेंचे पुत्र
राजश्री पाटील, यवतमाळ – हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांच्या पत्नी
श्रीकांत शिंदे, कल्याण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र
उद्धवसेना
ओमराजे निंबाळकर, धाराशिव – पवनराजे निंबाळकरांचे पुत्र
संजय दिना पाटील, मुंबई उ .पू. – मा. आमदार दीना बामा पाटील यांचे पुत्र
अमोल कीर्तिकर, मुंबई उ.पू. – खा. गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव
करण पवार, जळगाव – मा. आमदार भास्कर पाटील यांचे नातू,
सत्यजित पाटील, हातकणंगले – माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे
संजोग वाघेरे, मावळ – मा. आ. बाबासाहेब पाटील सरुडकरांचे पुत्र
राजाभाऊ वाजे, नाशिक – पिंपरीच्या सरपंचाचे पुत्र, आजोबा शंकर, आजी रुक्मिणी मा. आमदार
राष्ट्रवादी अजित पवार गट :
सुनेत्रा पवार, बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी
राष्ट्रवादी शरद पवार गट :
सुप्रिया सुळे, बारामती – शरद पवारांच्या कन्या
धैर्यशील मोहिते, माढा – माजी उपमुख्यमंत्री विजवसिंह मोहिते पाटलांचे पुतणे
अमर काळे, वर्धा – माजी आ. डॉ. शरद काळेंचे पुत्र
काँग्रेस :
प्रणिती शिंदे, सोलापूर – माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या
गोवाल पाडवी, नंदुरबार – माजी मंत्री के. सी. पाडवींचे पुत्र
प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर – दिवंगत खासदार बाळू धानोरकरांच्या पत्नी