लोकसभा निवडणुकींसाठी देशभर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सात टप्प्यातील मतदानानंतर ४ जून ला निकाल लागेल. या निवडणुकांमध्ये भाजप हा मोठा पक्ष राहिला. तर त्याची टक्कर कुठे काँग्रेस तर कुठे राज्यानुसार असणाऱ्या प्रादेशिक पक्षांसोबत झाली.
दरम्यान महाराष्ट्राचा किंवा इतर राज्याचा विचार केला तर पक्षाच्याच उमेदवाराचा प्रचार चर्चेत राहिला. अपक्षांचा गवगवा म्हणावा तसा राहिलेला नाही. देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर ज्या निवडणूक होत गेल्या त्यात 1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत 37 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता.
परंतु त्यानंतर लोकसभा निवडणुकीत अपक्षांचे वर्चस्व कमी होत असल्याचे चित्र आहे. 2019 लोकसभा निवडणुकांचे चित्र जर आपण पाहिले तर ही संख्या केवळ चार अपक्ष खासदारांवर स्थिरावल्याचे दिसते.
2014 मध्ये देशातील सर्वात कमी अपक्ष खासदारांची संख्या केवळ तीन होती. 1957 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 42 अपक्ष खासदार विजयी झाले. वर्षानुवर्षे निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेद्वारांची संख्या वाढत गेली, परंतु संसदेतील त्यांचे प्रतिनिधित्व कमी होत गेले. 2019 मध्ये मोदी लाट असूनही लोकसभा निवडणुकीत चार अपक्ष उमेदवार विजयी झाले.
महाराष्ट्रातील अमरावतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकलेले नवनीत राणा यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. दमण आणि दीवचे अपक्ष खासदार मोहन देऊळकर यांचे निधन झाले.
आसाममधील कोक्राझारमधून नबा हीरा कुमार सरनिया आणि कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघातून सुमन लता अंबरीश यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. 1952 च्या देशातील पहिल्या निवडणुकीत डोकावून पाहिले तर 533 अपक्ष उमेदवार उभे होते. यात 37 अपक्ष उमेदवार विजयी झाले. 360 अपक्षांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. दरम्यान कालौघात अपक्ष उमेदवारांची संख्या कमी होत गेली.
वर्ष विजयीअपक्ष
१९५२ ३७
१९५७ ४२
१९६२ २०
१९६७ ३५
१९७१ १४
१९७७ ०९
१९८० ०९
१९८४ ०५
१९८९ १२
१९९१ ०५
१९९६ ०९
१९९८ ०६
१९९९ ०६
२००४ ०५
२००९ ०९
२०१४ ०३
२०१९ ०४