महाराष्ट्रात ‘हे’ 48 उमेदवार होणार विजयी? पहा Exit Poll ची संपूर्ण यादी

Pragati
Published:
EXIT

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जूनला पार पडला. आता उद्या ४ जूनला निकाल लागेल. तत्पूर्वी आता विविध मीडियाचे तसेच संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोल मध्ये साधारण एक अंदाज वर्तवला जातो व यामध्ये कोण विजयी होईल याचा एक अंदाज येऊ जातो.

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामधून नेमकं कोण विजयी होईल याविषयी India Today-Axis My India एक्झिट पोलमध्ये काही अंदाज वर्तवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार या तीन पक्षांची महाविकास आघाडी व दुसरीकडे भाजप, शिवसेना – शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती अशी लढत झाली.

चला तर मग India Today-Axis My India एक्झिट पोलमध्ये जी संभाव्य 48 जागांवरील विजयी उमेदवारांची यादी दाखवली आहे त्यावर एक नजर टाकुयात –

1. नंदूरबारमध्ये भाजपच्या हिना गावित
2. दिंडोरीमध्ये भाजपच्या भारती पवार
3. जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ
4. धुळेमध्ये भाजपचे सुभाष भामरे
5. रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे

6. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे
7. शिर्डीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे
8. अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे

9. हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम-कोहळीकर
10. कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे
11. ठाणेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के
12. बुलढाणामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव
13. मावळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे
14. यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख

15. छ. संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संदिपान भुमरे
16. हातकणंगलेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने
17. लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे
18. धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर
19. परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव

20. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे
21. नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण
22. जालनामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे
23. मुंबई उत्तरमध्ये भाजपचे पियूष गोयल
24. मुंबई उत्तर मध्यमध्ये भाजपचे उज्ज्वल निकम

25. मुंबई उत्तर पूर्वमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील
26. मुंबई उत्तर पश्चिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर
27. मुंबई दक्षिण मध्यमदेह शिवसेना ठाकरे गटचे अनिल देसाई
28. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत

29. नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी
30. अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा
31. अकोलामध्ये भाजपचे अनुप धोत्रे
32. वर्धामध्ये भाजपचे रामदास तडस
33. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते
34. रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अशोक पारवे

35. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर
36. भंडारा-गोंदियामध्ये भाजपचे सुनील मेंढे
37. माढामध्ये भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर
38. पुणेमध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ

39. सांगली मध्ये विशाल पाटील (अपक्ष) निवडणून येण्याची शक्यता आहे
40. शिरूर मध्ये NCP शरद पवारगटाचे अमोल कोल्हे
41. बारामती – सुप्रिया सुळे (NCP शरद पवार)
42. सातारामध्ये भाजपचे उदयनराजे भोसले
43. कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक

44. सोलापूरमध्ये काँग्रेसचे प्रणिती शिंदे
45. रायगड – सुनील तटकरे (NCP अजित पवार)
46. भिवंडी – सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार)
47. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे
48. पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe