विधानसभा निवडणूक

विधानसभा निवडणुकांचे ‘हे’ आहेत आतापर्यंतचे सगळ्यात आश्चर्यकारक आणि धक्कादायक निकाल! फक्त शंभरच्या आतील मत फरकाने जिंकले आहेत ‘हे’ उमेदवार

Published by
Ajay Patil

Maharashtra Assembly Election Result:- विधानसभा निवडणुका या राज्याच्या सत्ताकारणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे अशा निवडणुका असतात. त्यामुळे आपल्याला राज्यातील बऱ्याच मतदारसंघांमध्ये काटे की टक्कर दिसून येते. बऱ्याचदा आपण निवडणुकीच्या निमित्ताने काटे की टक्कर हा शब्द वापरत असतो.

म्हणजे काही विधानसभा मतदारसंघांमध्ये इतक्या चुरशीच्या लढती होतात की काही हजार मतांच्या फरकाने उमेदवार जिंकतात. अशा लढतींना आपण चुरशीच्या लढती असे देखील म्हणतो. जर आपण आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बघितले तर आतापर्यंत असे अनेक धक्कादायक निकाल या निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेले आहेत.

आजपर्यंत जवळपास 100 ते 300 मतांच्या फरकाने 23 आमदार जिंकलेले आहेत. इतकेच नाही तर शंभरच्या आतील मत फरकाने आजवर बारा जणांनी विधानसभा निवडणूक जिंकली आहे. आजची जर आपण निवडणुकांच्या निकालाची स्थिती बघितली तर ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान होत असल्यामुळे निवडणूक निकाल जाहीर होण्याच्या तारखेलाच निकाल संध्याकाळपर्यंत हाती येतात.

परंतु अगोदर मतपत्रिकांवर मतदान व्हायचे व दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत संपूर्ण निकाल हाती लागत होते. तसेच या मतपत्रिकेवर मतदानाच्या संदर्भात मतपत्रिकांबाबत अवैध मतपत्रिका यासंदर्भामध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी आक्षेप घ्यायचे व त्यामुळे खूप वेळ लागत होता.

आजपर्यंत विधानसभा निकालांच्या इतिहासामध्ये जर डोकावून बघितले तर केवळ सहा मतांच्या फरकाने देखील निकाल लागल्याचे दोन उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. त्यातील पहिले पाहिले तर 1978 मध्ये जनता पक्षाची लाट होती व त्यावेळी नांदेड जिल्ह्याच्या हादगाव मतदार संघात जनता पक्षाचे निवृत्तीराव पवार यांनी काँग्रेसचे बापूराव शिंदे यांचा केवळ सहा मतांनी पराभव केला होता.

तसेच 1990 मध्ये मध्य नागपूरमध्ये असेच एक चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या लढतीमध्ये जनता दलाचे डॉ.यशवंत बाजीराव यांनी काँग्रेसचे आणि अनिस अहमद  पराभव केला होता. हे प्रकरण कोर्टात गेले होते व फेर मतमोजणी करण्यात आली होती व या फेरमतमोजणीच्या निकालामध्ये देखील डॉ. यशवंत बाजीराव हेच जिंकले होते.

 हे आहे 100 ते 300 मतांच्या फरकाने जिंकलेले आमदार

1- बाबुराव चाकोते( काँग्रेस, सोलापूर शहर उत्तर) वर्ष 1980- 101 मतांनी निवडले होते.

2- अण्णा जोशी( भाजप,शिवाजीनगर पुणे) वर्ष 1985- 111 मताधिक्याने विजयी झाले होते.

3- गोविंदराव चौधरी( भाजपा,साक्री) वर्ष 1990- 113 मताधिक्यांनी जिंकले होते.

4- शिवशंकर उटगे( काँग्रेस,औसा मतदार संघ) वर्ष 1980- 114 मतांनी विजयी झाले होते.

5- महादू बबोरा( शहापूर, काँग्रेस) वर्ष 1990- 118 मतांनी विजयी झाले होते.

6- दगडू गलांडे( जनता पक्ष, हिंगोली) वर्ष 1978- 121 मतांनी विजयी झाले होते.

7- अब्दुल कादिर देशमुख( काँग्रेस, परतूर विधानसभा मतदारसंघ) वर्ष 1995- 122 मतांनी विजयी झाले होते.

8- संजय देशमुख( अपक्ष, दिग्रस विधानसभा मतदारसंघ) वर्ष 1999- 126 मतांनी विजयी झाले होते.

9- प्रेम कुमार शर्मा– (भाजप, खेतवाडी) वर्ष 1980- 140 मतांनी विजयी झाले होते.

9- डॉ.सतीश पाटील( राष्ट्रवादी, पारोळा विधानसभा मतदारसंघ) वर्ष 2004- 147 मतांनी विजयी झाले होते.

10- धनराज महाले( शिवसेना, दिंडोरी विधानसभा मतदारसंघ) वर्ष 2009- 149 मतांनी विजयी झाले होते.

11- माधवराव पवार( काँग्रेस, गेवराई विधानसभा मतदारसंघ) वर्ष 1980- 157 मतांनी विजयी झाले होते.

12- शहाजीराव पाटील( काँग्रेस, मोहोळ विधानसभा मतदारसंघ) वर्ष 1985- 167 मतांनी विजयी झाले होते.

13- विठ्ठल तुपे( जनता पक्ष, पुणे कॅन्टोन्मेंट) वर्ष 1985- 177 मतांनी विजयी झाले होते.

14- जनार्धन बोंद्रे( काँग्रेस, चिखली विधानसभा मतदारसंघ) वर्ष 1978- 178 मतांनी विजयी झाले होते.

15- शहाजी बापू पाटील( काँग्रेस, सांगोला) वर्ष 1995- 192 मतांनी विजयी झालेले होते.

16- कल्याणराव पाटील(शिवसेना, येवला विधानसभा मतदारसंघ) 1999- 221 मतांनी विजयी झाले होते.

17- रामचंद्र बेंडाळ( काँग्रेस, गुहागर विधानसभा मतदारसंघ) वर्ष 1980- 226 मतांनी विजयी झाले होते.

18- सदाशिवराव मंडलिक( समाजवादी काँग्रेस, कागल विधानसभा मतदारसंघ) वर्ष 1985- 231 मतांनी विजयी झाले होते.

19- कन्हैयालाल नहार(अपक्ष, नांदगाव विधानसभा मतदारसंघ) 1978- 243 मतांनी विजयी झाले होते.

20- कमल उल्हास ढोले पाटील( राष्ट्रवादी, भवानी पेठ) वर्ष 2004- 257 मतांनी विजयी झाले होते.

21- नारायण पाटील( शिवसेना, करमाळा) वर्ष 2014- 257 मतांनी विजयी झाले होते.

22- अर्जुन खोतकर(शिवसेना, जालना) वर्ष 2004- 296 मतांनी विजयी झाले होते.

Ajay Patil