विधानसभा निवडणूक

Loksabha Election 2024 : अहमदनगर व शिर्डी लोकसभेसाठी ह्या दिवशी होणार मतदान ! जाणून घ्या संपूर्ण निवडणुकीचे वेळापत्रक

Published by
Ahmednagarlive24 Office

Loksabha Election 2024 : निवडणूक आयोगाच्या वतीन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, जिल्ह्यात आचारसंहिता जारी झालेली आहे.

अहमदनगर मतदार संघासाठी एकूण मतदार १९ लाख ३७ हजार ८४९ आणि शिर्डी मतदार संघासाठी १६ लाख ६७ हजार ५१७ असे दोन्ही मतदार संघात एकूण ३६ लाख ३५ हजार ३६६ मतदार आहेत. दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी एकूण ३ हजार ७३४ मतदार केंद्रावर मतदान होणार आहे.

यासाठी सुमारे २० हजार अधिकारी-कर्मचारी आणि पोलिस जवान तैनात राहणार आहेत, अशी माहिती देत, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे ‘पालन निवडणुकी दरम्यान प्रत्येक घटकाने करावे. नियमांचे उल्लघंन आढळल्यास कारवाई केली जाईल, असा कठोर इशारा शिडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीची घोषणा नवीदिल्ली येथील विज्ञान भवनातून भारत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्‍त यांनी शनिवारी (दि. १६) केली. यानंतर लगेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, महसूसल उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, तहसीलदार प्रदीप ‘पाटील, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, शंकर रोडे आदी उपस्थित होते.

या लोकसभा निवडणुकीत प्रथमच सीझर कमिटी स्थापन होत आहे. लोकसभा निवडणुक करीता ९ हजार ८९० बी.यु., ५ हजार ५६७ सी.यु. आणि ६ हजार १७ व्हीव्हीपॅट प्राप्त झालेले आहेत. त्याचे प्रथम स्तरीय तपासणी पुर्ण झालेली असुन सर्व विधानसभा मतदारांसाठी वापरण्यात येणा-या इव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट मशीनस जोडण्यात येणार आहेत. ज्याव्दारे मतदाराला आपण मतदान केलेल्या उमेदवारालाच मत दिले गेले असलेबाबत खात्री करता येणार आहे. आचारसंहितेचे काटेकोर ‘पालन होणेसाठी पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

एसपींचा परखड इशारा

यावेळी निवडणुकीसाठीच्या कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला म्हणाले, निवडणुकीदरम्यान भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेदरम्यान पुरेसा सुरक्षेचा फौजफाटा तैनात होईल. परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी एकूण १२ पथके तैनात राहतील. या दरम्यान या काळात तब्बल १५ हजार जणांवर वेगवेगळ्या स्वरूपाची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. आचारसहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे. नियमाचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा परखड इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला.

असे आहे संपूर्ण निवडणुकीचे वेळापत्रक
१८ एप्रिल – अधिसूचना जारी
२५ एप्रिल – अर्ज भरण्याची अंतिम मुदत
२६ एप्रिल – प्राप्त अर्जांची छानणी
२९ एप्रिल – अर्ज भरण्याची अंतिम मुदत
१३ मे – मतदान
४ जून – मतमोजणी

Ahmednagarlive24 Office