Railway Project In Maharashtra:- सन 2014 मध्ये केंद्रात पूर्ण बहुमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले व तेव्हापासून देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या व या योजना राबवताना समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करून त्या दृष्टिकोनातून या योजनांची आखणी करून अंमलबजावणी करण्यात येत आहे.
त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील केंद्रात भाजप प्रणित सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झाले असून विकासाची ही गंगा अशीच सुरू राहील हे आपल्याला गेल्या दोन टर्मवरनं दिसून येते.
यामध्ये जर आपण पाहिले तर केंद्रीय रेल्वे खात्याच्या माध्यमातून देशामध्ये अनेक नवीन रेल्वे मार्गांचे काम सुरू करण्यात आले असून महाराष्ट्रासाठी देखील रेल्वे खात्याच्या माध्यमातून भरभरून असा निधी देण्यात आला आहे. जर आपण रेल्वे खात्याचा विचार केला तर यामध्ये केंद्रात जेव्हा 2009 ते 2014 या कालावधीत काँग्रेस प्रणित यूपीएचे सरकार होते
तेव्हा त्या पाच वर्षांमध्ये रेल्वे खात्याने महाराष्ट्रासाठी 1171 कोटी रुपयांची तरतूद केली होती व आता मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये रेल्वे खात्याने सन 2024-25 या कालावधीमध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल पंधरा हजार 940 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसिद्ध वृत्तपत्र लोकमतशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी रेल्वे खात्याने महाराष्ट्राला काय दिले याचा लेखाजोखाच मांडला.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मांडलेला लेखाजोखा
सध्या जर आपण रेल्वे खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रकल्पांचा विचार केला तर यामध्ये मुंबई आणि एमएमआर क्षेत्राचा रेल्वे सेवेचा चेहरा मोहराच पूर्णतः बदलून जाईल अशा दृष्टिकोनातून प्रकल्प हाती घेण्यात आले असून या संपूर्ण प्रकल्पांसाठी सुमारे 16 हजार 240 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
या प्रकल्पांमध्ये बरीच कामे पूर्ण झालेली असून हे प्रकल्प नेमके कधी पूर्ण होतील याची डेडलाईन देखील केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितली. सीएसएमटी ते कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गीका, मुंबई सेंट्रल ते बोरीवली, गोरेगाव ते बोरवली हार्बर लाइनचा विस्तार, विरार ते डहाणू रोड तिसरी व चौथी मार्गीका,
पनवेल ते कर्जत सबर्बन कॉरिडॉर, ऐरोली ते कळवा सबर्बन कॉरिडॉर, कल्याण ते आसनगाव चौथी मार्गेका, कल्याण ते बदलापूर तिसरी व चौथी मार्गीका, कल्याण ते कसारा तिसरी मार्गीका, नायगाव ते जुईचंद्र डबल लाईन, निळाजे ते कोपर डबल लाईन या प्रकल्पांचा या मुंबई आणि एमएमआर क्षेत्राच्या प्रकल्पांमध्ये समावेश आहे.
महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत एक लाख 64 हजार कोटी रुपये खर्चाची कामे
सध्या महाराष्ट्रात रेल्वे खात्याकडून एक लाख 64 हजार 605 कोटी रुपये खर्चाची विविध कामे केली जात असून त्यात चालू प्रकल्प 81 हजार पाचशे ऐंशी कोटी रुपये तर अमृतस्थानकांची उभारणी करिता 6411 कोटी रुपये, रेल्वे फ्लाय ओव्हर आणि अंडर ब्रिज प्रकल्पांकरिता सुमारे 5,615 कोटी रुपये, बुलेट ट्रेन करिता 33 हजार 160 कोटी रुपये,
डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर करिता 12697 कोटी रुपये,जालना ते जळगाव या 174 किलोमीटर नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणी करिता 7106 कोटी रुपये तर मनमाड ते इंदूर नवीन रेल्वे मार्गाकरिता 18 हजार 36 कोटी रुपये मंजूर करण्यात आली असून हे प्रकल्प महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत.