लोकसभा निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आहेत. एक शेवटचा टप्पा झाला की निवडणुका संपतील. त्यानंतर चार जूनला निकाल लागेल. सध्या महाराष्ट्रातील सर्वच जागेंवरील निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्वच ठिकाणी ४ जूनची वाट पाहत आहेत. कोण विजयी होईल? सत्ता कुणाची येईल?
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का? शरद पवार इंडिया आघाडीचे गणित जुळतील का? आदी प्रश्न सर्वानाच पडले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण उत्साहाने निकालाची वाट पाहत आहे. त्यामुळे आता चार जूनला पहिला निकाल किती वाजता येणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.
चार जूनला कधी येईल निकाल?
चार जूनला सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाईल त्यानंतर 8.30 वाजता ईव्हीएमची मोजणी सुरु होणार आहे. त्यामुळे साधारण सकाळी 9 वाजता ईव्हीएमच्या पहिल्या राऊंडचा निकाल येऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मतमोजणीसाठी प्रशासनाने कंबर कसली असून मतमोजणीची जय्यत तयारी सुरु केली आहे. मतमोजणी दिवशी मतमोजणीच्या ठिकाणी तगडा पोलिसबंदोबस्त असणार आहे.
स्ट्रॉन्गरूम वर करडी नजर, सेक्युरिटीही मोठी
ईव्हीएममध्ये मतदान बंद झाल्यानंतर ईव्हीएम मशिन या स्ट्रॉन्गरूम मध्ये आणलेल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जेथे ईव्हीएम ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी पोलिस पथक तसेच सुरक्षारक्षक दलांचा थ्री लेअर सुरक्षा कवच आहे. सीसीटीव्ही देखील त्यावर करडी नजर ठेऊन आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी व समर्थक देखील बाहेर पहारा देत असल्याचे चित्र आहे.
या ठिकाणी होणार हायव्होल्टेज लढती
महाराष्ट्रात अशा काही जागा आहेत की जेथे हायव्होल्टेज लढती होणार असून राज्यासह देशाचेही लक्ष या जागेकडे लागले आहे. बारामती, माढा, शिरूर,बीड, नगर, सांगली, सोलापूर, अमरावती, कल्याण, ठाणे ही ती मतदार संघ असून अगदी कांटे की टक्कर या ठिकाणी झालेली आहे.