Maharashtra Politics : महाराष्ट्रातील लोकसभेचे वातावरण आता चांगलेच गरम होऊ लागले आहे. राजकीय कोडे हळू हळू सुटताना दिसत असले तरी काही ठिकाणचे गणित आणखीनच अवघड होऊन बसला आहे. यात काही ठिकाणी उमेदवारही निश्चिती होत नाहीये.
आता नाशिकची जागा अजित पवार गटातून छगन भुजबळ यांना राहील असे वाटत होते. परंतु विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे देखील दावा सोडण्यास तयार नाहीत.
आता या जागेबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. या ठिकाणी नवीनच चेहरा उमेदवार म्हणून दिल तर लोक स्वीकारतील असे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जागेबाबत सांगताना असे म्हटले आहे की, नाशिकच्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांचा दावा आहे. तर खा. हेमंत गोडसे यांनी देखील या जागेवर दावा केलाय. परंतु या ठिकाणी नवीन चेहरा दिला तर लोक स्वीकारतील असे मत त्यांनी मांडले आहे.
त्यामुळे आता भाजपच्या गोटात खरोखर वेगळे गणिते सुरु आहेत का हे पाहणे गरजेचे रहाणार आहे. या ठिकाणी सध्या गोडसे हे जागा मिळत नसल्याने नाराज आहेत तर आता तिकीट दोघांनाही नाही मिळाले तर हे दोघेही नवीन चेहऱ्याचे काम करतील का अशी मोठी चर्चा सध्या रंगली आहे.
भुजबळांना विरोध
मंत्री भुजबळ यांना तिकीट देण्यासाठी हेमंत गोडसे व समर्थक यांचा विरोध आहे. या जागेवर शिंदे गटाचा खासदार आहे त्यालाच जागा मिळावी अशी मागणी गोडसे समर्थक करत आहेत. त्यामुले आता येथील राजकीय द्वंद्व चांहलेच रंगले आहे.