नगर ठरवणार राजा कोण ! वाढलेला टक्का लंकेंच्या की विखेंच्या फायद्याचा? कोणत्या प्रभागातील मतदान वाढले ते पहा, त्यावर बदलणार गणित

Ahmednagarlive24 office
Updated:
lanke vikhe

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत १३ मे ला किरकोळ प्रकरणे वगळता सर्वत्र उत्स्फूर्त व शांततेत मतदान झाले. यावेळी मतांची टक्केवारी वाढलेली दिसली. विशेष म्हणजे नगर शहरात मतदानाचा टक्का वाढला हा एक महत्वाचा मुद्दा मानला जात आहे.

नेहमीप्रमाणे यंदाही नगर शहरच राजा कोण होणार अर्थात कोण उमेदवार विजयी होणार हे ठरविलं असे म्हटले जात आहे. २०१९ मध्ये ६०.२६ टक्के मतदान झाले होते. या वेळी त्यात वाढ होऊन ६२.५० टक्के झाले आहे.

गेल्यावेळी सुजय विखे यांना नगर शहरातून चांगले लीड मिळाले होते. यंदा नगर कुणाला लीड देणार हे कोणत्या प्रभागातील मतदान वाढले हे पाहून त्यावरून याचा अंदाज बांधला जाईल.

लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत या मतदारसंघाचे लक्ष्य नगर शहरावर असते. शहरातील कौल कोणाकडे असेल, त्यानुसार विजयाचे गणित ठरले जाते. २००९ व २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार दिलीप गांधी विजयी झाले होते. त्यांना नगर शहरातून चांगले मताधिक्य मिळाले होते.

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप हे स्थानिक होते. या निवडणुकीत डॉ. विखे यांना मताधिक्य मिळाले. यंदाच्या निवडणुकीत आमदार जगताप हे विखेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांना मताधिक्य मिळेल, असे विखे समर्थक सांगत आहेत. तर नीलेश लंके यांनी देखील मागील काही दिवसांपासून नगर शहरावर लक्ष केंद्रित केले होते.

विविध समस्या, प्रश्नावर ते बोलत होते व महाविकास आघाडीची ताकदही शहरातून त्यांच्या मागे दिसली त्यामुळे त्यामुळे त्यांना मताधिक्य मिळेल, असे लंके समर्थक सांगत आहेत. तथापि, कोणत्या प्रभागातील केंद्रांवर जास्त मतदान झाले, यावरच विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

शहरात आमदार जगताप यांच्या प्रयत्नांतून व खासदार डॉ. विखे यांच्या सहकार्यामुळे उड्डाणपूल झाला. इतर दोन पूलही नियोजित आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कमी झाला. नळ पाणी पुरवठा योजनेची फेज-२ ची पाणी योजना, सिमेंटचे नव्याने झालेले रस्ते ही विकासकामे प्रचारात महायुतीचे उमेदवारांमार्फत सांगण्यात आली.

विरोधी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी नगर शहरातील खड्डे, औद्योगिक वसाहतीतील प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न मांडून प्रचारात रंगत आणली. हे मुद्दे नगरकरांना किती भावतात, हे निकालावरून दिसून येणार आहे.

नगर शहरावर विजयाचे गणित अवलंबून
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नीलेश लंके यांनी नगर शहरावर लक्ष केंद्रित केले होते. मतदानाच्या दोन दिवस आधी लंके हेही शहरात तळ ठोकून होते. यंदा नगर कुणाला लीड देणार हे कोणत्या प्रभागातील मतदान वाढले हे पाहून त्यावरून याचा अंदाज बांधला जाणार आहे. अद्याप ही आकडेवारी समोर आली नसून, ही आकडेवारी जाहीर होताच अंदाज लावायचा असेल तर नागरिकांनी प्रभागवाईज आकडेवारी पाहावी व त्यानुसार अंदाज लावलेला सोयीस्कर राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe