विधानसभा निवडणूक

लंकेंविरोधात पंतप्रधानांना सभा का घ्यावी लागली ? रोहित पाटील यांचा सवाल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

काही दिवसांपूर्वी कळाले की अनेक नेत्यांच्या सभा नगर दक्षिणमध्ये होत आहेत. नीलेश लंके साधा सुधा माणूस असता तर त्यांच्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांना नगर दक्षिणमध्ये येण्याची काय गरज भासली ? याचे उत्तर भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी देण्याची आवश्यकता असल्याचे रोहित आर.आर.पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या पाथर्डी व बोधेगाव येथे पार पडलेल्या प्रचाराच्या सांगता समारंभात रोहित पाटील हे बोलत होते. सांगता सभेस मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते. उमेदवार नीलेश लंके, आ. रोहित पवार, प्रताप ढाकणे नितीन काकडे, राजाभाऊ दौंड, रामदास गोल्हार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, या निवडणूकीच्या माध्यमातून महाराष्ट्राची अस्मिता, प्रतिष्ठा जपण्याची संधी आपल्या सर्वांना आली आहे. यशवंतराव चव्हाणांपासून वसंतराव नाईकांपर्यंत या महाराष्ट्रावर काँग्रेस व घटकपक्षांनी उपकार केले आहेत ते आपण विसरणार का ? शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत वाढवायची असेल तर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार त्यांच्या पाठीशी उभे करण्याचे काम केले पाहिजे असे आवाहन पाटील यांनी केले.

पाटील पुढे म्हणाले, केदारेश्‍वर कारखाना उभा करण्यासाठी स्व.बबनराव ढाकणे यांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केेले, मदत केली. इथल्या अनेक प्रश्‍नांना न्याय देण्याचे काम पवार यांनी केले असून त्यांच्या माध्यमातून या भागात शास्वत काम उभे राहिले आहे. या शास्वत कामाला गती द्यायची असेल तर पवार यांच्याशिवाय पर्याय नाही हे दिल्लीला ठणकाऊन सांगण्याची वेळ आला आली आहे.

कोरोना संकटात गावगाडयातील माणसाची ओळख
नीलेश लंके यांच्यासारखा एक चांगला उमेदवार नगर दक्षिणसाठी दिला आहे. नीलेश लंके साधा माणूस आहे. अनेक वर्षे आम्ही त्यांना पाहतो आहोत. कोरोनाच्या काळात नीलेश लंकेे हा गावगाडयातला माणूस आहे ही ओळख संपूर्ण महाराष्ट्राला पटली. गावगाडयातला माणूस काय काम करू शकतो ? क्रांतीकारक निर्णय घेऊ शकतो. बंड करून स्वतःच्या हिमतीवर निवडूण येऊ शकतो. हे लंके यांनी गेल्या विधानसभेला दाखवून दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हिणवणारांना मतदानातून उत्तर द्या
जी माणसं गावगाडयातल्या माणसाला कमी लेखतात, हिणवताहेत त्यांना या लोकसभेच्या निवडणूकीच्या मतदानातून उत्तर द्यायचे आहे. गावगाडयाचा माणूस दिल्लीच्या तख्खावर बसवून दाखवायचा हा निर्धार नगर दक्षिणच्या मतदारांनी करण्याची आवष्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले.

फडणवीसांचा विखेंच्या कर्तुत्वावर विश्‍वास नाही का ?
देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहिल्यावर सांगतात की इथल्या स्थानिक उमेदवाराला पाहू नका. पंतप्रधान मोदींना करायचे आहे, त्यांच्याकडे पाहून मत द्या. याचा एकच अर्थ होतोय की डाळ साखरेवर त्यांच्या विश्‍वास नसावा किंवा इथल्या स्थानिक उमेदवाराच्या कर्तुत्वावर विश्‍वास नसावा असा टोला पाटील यांनी लगावला.

मालकाकडे पाहून कोणी बैलाची खरेदी करते का ?
पाथर्डीला बैलांचा मोठा बाजार भरतो. इथली अनेक लोकं त्या बाजारात जाऊन बैल खरेदी विक्री करत असतील. मालकाकडे पाहून बैल खरेदी केल्याचे एक तरी उदाहरण महाराष्ट्रामध्ये आहे का ? आमचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिल्लीतून मोदी इकडे येणार आहेत का ? रोहित पवार युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

तर त्यांनी बोधेगांवलाही सभा घेतली असती !
निवडणूक आयोगाची यांच्यावर मेहरबाणीच म्हणावी लागेल. प्रत्येक जिल्हयात जाऊन त्यांना सभा घ्याव्या लागतात. आणखी दोन चार टप्पे निवडणूक आयोगाने वाढविले असते तर बोधेगांवमध्ये पंतप्रधानांची सभा घेण्यासाठी त्यांनी मागे पुढे पाहिले नसते. इतकी दयनीय स्थिती यांची झाली असल्याचे पाटील म्हणाले.

ते तुमच्याशी प्रामाणिक राहतील का ?

हेलीकॉप्टरमधून फिरणारा खासदार हवा की जमिनीवर राहून सर्वसामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावणारा खासदार पाहिजे हे ठरविण्याची जबाबदार मतदारांची आहे. लोकांमध्ये जाऊन काम करणारा, महाराष्ट्रामध्ये ओळख असणारा नेता नीलेश लंके आहे. नीलेश लंके यांचे वडील पालकमंत्री असते तर त्यांनी महाराष्ट्र नाही तर देश हादरवून टाकला असता. काँग्रेसचे उपकार विसरून ज्यांनी सत्तेच्या मोहापायी भाजपामध्ये प्रवेश केला ते तुमच्या आमच्या बरोबर प्रामाणिक राहू शकत नाहीत असे पाटील म्हणाले.

रात्री २ वाजता लंके यांनी अडचण दूर केली
नीलेश लंके सर्वसामान्यांचा उमेदवार आहे. एकदा रात्री २ वाजता मी त्यांना फोन केला. त्यांनी इतक्या रात्री फोन घेतला. आमच्याकडचा ट्रान्सपोर्ट व्यवसायीक या भागात आला होता. त्याला अडचण आली म्हणून मी लंके यांना मदत करण्याची विनंती केली. रात्री अडीच वाजता लंके यांचा फोन आला की त्या व्यवसायीकाची अडचण दुर झाली असून तो इथून रवाना झाला आहे. असे त्यांचे काम आहे असे पाटील म्हणाले.

विरोधी उमेदवाराची पाकीटे लंके यांना !
लंके यांच्या विरोधातील एका उमेदवाराने ग्रामपंचायत, सोसायटी पदाधिकारी व सदस्यांना वितरीत केलेल्या पाकीटांपैकी काही पदाधिकारी, सदस्यांनी त्यांना मिळालेली पाकीटे नीलेश लंके यांच्याकडे सूपूर्द केली ! त्याची चांगलीच चर्चा सभास्थळी रंगली होती.

अहमदनगर लाईव्ह 24