विधानसभा निवडणूक

निलेश लंके यांना उमेदवारी का दिली ? राधाकृष्ण विखे यांचा गौप्यस्फोट व दक्षिणेत चर्चांना उधाण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लोकसभा मतदार संघात विखे-लंके अशी राजकीय लढत फिक्स झाली व राजकीय धुळवडीला विविध रंग येऊ लागले. अहमदनगर लोकसभा मतदार संघात कोण विजयी होईल यांच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. ही लढत एक हाती न होता अत्यंत घमासान लढत होईल व विजय नेमके कुणाचा होईल याचाच अंदाज बांधणेही कठीण असेल असे राजकीय जाणकार सांगतात.

दरम्यान ही लढत फिक्स झाल्यानंतर खा. सुजय विखे यांचे पिता अर्थात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पद्धतीने राजकीय सूत्र हलवण्यास सुरवात केली. त्यात सुरवातीला म्हणजे त्यांनी आ. राम शिंदे यांची भेट घेत नाराजगी दूर करण्याच्या प्रयत्न केला. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत नाराज असणाऱ्या स्वपक्षीयांना आपलेसे करण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान आता विखे यांनी लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर व शरद पवार यांच्याबाबत राजकीय वक्तव्य करत गौप्यस्फोट घडवून आणला आहे.

काय म्हणाले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मागील लोकसभेच्या निवडणुकीत आमची लढत थेट शरद पवार यांच्याशीच होती व त्यावेळी शरद पवार या मतदारसंघात तळ ठोकून बसलेले होतेच. पण असे असले तरी त्यांचे काही चालले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूनेच मतदारांनी कौल दिला व त्याने सुजय विखे विजयी झाले व मोदी लाटेपुढे शरद पवार निष्प्रभ ठरले होते असे विखे म्हणाले.

लंके यांच्याविषयी बोलताना विखे म्हणाले, आमच्या विरोधातील उमेदवाराला बरीच भर घातलेली दिसत असून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी निवडणुकीत असे प्रयोग केले जात असतात व याचाच एक भाग म्हणून आ. लंके यांना उमेदवारी दिली. परंतु आता याचा काहीही परिणाम मतदारांवर होणार नसून भाजपच्या यंत्रणेपुढे सर्वकाही पुन्हा एकदा निष्प्रभ ठरेल असे विखे पाटलांनी म्हटले आहे.

राऊतांवरही टीकास्त्र
यावेळी विखे यांनी संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता टीका केली. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा घणाघात त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्यांकडून रोज अनाकलनीय आरोप केले जात असून त्याचाच परिणाम ठाकरे यांच्यावर देखील झाल्याचे दिसते असे विखे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24