विधानसभा निवडणूक

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार ? जगताप आघाडीवर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Nagar Politics : नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना मिळाली आहे. महायुतीने ही जागा अजित पवार गटाला सोडली होती यानुसार अजित पवार गटाने विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

जगताप यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी विधानसभेसाठी तयारी देखील सुरू केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील आता या जागेवर जवळपास उमेदवार फायनल केलेला दिसतोय. महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांच्या गटाला सोडण्यात आली आहे.

तसेच शरद पवार गटाने या जागेवर माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देखील बहाल केली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी अर्थातच २६ तारखेला २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती.

यामध्ये कळमकर यांचा नावाचा समावेश आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघावरून सुरू असणारा गोंधळ आता थांबला आहे. महायुतीकडून जगताप अन आघाडीकडून कळमकर असा सामना होणार आहे. पण, या निमित्ताने आघाडीत एक वेगळाचं गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. खरेतर, या जागेवर शिवसेना ठाकरे गट दावा ठोकत होते.

पण, आज ही जागा शरद पवार गटाकडे गेल्याने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह सर्व नगरसेवक, शिवसैनिकामंध्ये नाराजीचा सुर आहे. शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा तुतारीला गेल्याने शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे आता नगरकरांचे लक्ष लागेले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24