अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  कधी-कधी असं होतं की तुम्हाला तुमच्या वाहनाच्या एकाच रंगाचा कंटाळा येतो. मनात विचार येतो की तो रंग बदलायचा आहे,

पण आता ते शक्य आहे का ? नुकतीच एक इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली आहे जी डोळे मिचकावण्याआधीच बटन दाबून आपला रंग बदलू शकते. त्याची खासियत जाणून घ्या.

काळा रंग बदलून पांढरी होणारी कार लक्झरी कार निर्माता BMW ने अलीकडेच त्यांची M-ब्रँड इलेक्ट्रिक कार iX M60 सादर केली आहे. बटन दाबल्यानंतर या कारचा बाह्य रंग बदलतो.

डोळ्याचे पारणे फेडण्याआधीच कार काळ्यापासून पांढर्‍या आणि पांढर्‍यापासून राखाडीकडे जाऊ शकते. कंपनीने ही कार अमेरिकेत सुरू असलेल्या

कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES-2022) मध्ये दाखवली असून तिला BMW iX M60 Flow असे नाव देण्यात आले आहे. आता तुम्ही विचार करत असाल की या कारचा रंग इतक्या सहजपणे कसा बदलतो.

ही कार अशा प्रकारे रंग बदलते कंपनीने या कारच्या पृष्ठभागावर ई-इंक कोटिंग केले आहे. त्यात लाखो मायक्रोकॅप्सूल आहेत, ज्यांचा व्यास मानवी केसांएवढा आहे.

प्रत्येक मायक्रोकॅप्सूलमध्ये पांढर्‍या रंगाचे निगेटिव चार्ज आणि काळ्या रंगाचे पॉजिटीव्ह चार्ज केलेले रंगद्रव्य असतात. अशा प्रकारे, बटण दाबून जेव्हा या पिगमेंट्सना संदेश पाठवला जातो तेव्हा ते पृष्ठभागाचा रंग बदलतात.

हे जवळपास मोबाईलच्या स्क्रीनवर वॉलपेपर बदलण्यासारखे आहे. ही BMW कार एक शक्तिशाली SUV आहे. ते 610 हॉर्सपावर निर्माण करते.