Electric Cars News : टाटा मोटर्स (TATA Motors) ही भारतातील जुनी वाहन कंपनी आहे. टाटा मोटर्स सतत ग्राहकांना काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असते. आता टाटा मोटारीच्या नवीन इलेक्ट्रिकल गाड्या (Electric Car) बाजारात उपलब्ध हिला सुरुवात झाली आहे. अशातच या कंपनीने नवीन इतिहास रचला आहे.

सतत वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहने (EV) कडे वळण्यास भाग पाडले आहे आणि अशा परिस्थितीत सर्व ऑटो कंपन्या (Auto companies) देखील इलेक्ट्रिक वाहनांवर जोमाने काम करत आहेत.

इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) मध्ये टाटा मोटर्सने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आहे. Tata Motors भारतात इलेक्ट्रिक वाहन (EV) विकण्यात आघाडीवर आहे.

त्यांनी बनवलेल्या Tata Nexon EV ने अर्ध्याहून अधिक मार्केट शेअर व्यापला आहे. टाटाने केवळ एका दिवसात 712 इलेक्ट्रिक वाहने (EV) वितरित करण्याचा नवा विक्रम केला आहे.

ईव्हीच्या बाजारपेठेत एकट्या टाटा मोटर्सचा वाटा ८७ टक्के आहे

टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांना 712 इलेक्ट्रिक वाहने वितरित केली आहेत, त्यापैकी 564 नेक्सॉन ईव्ही आणि 148 टिगोर ईव्ही आहेत.

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) बाजारपेठेतील 87 टक्के वाटा एकट्या टाटा मोटर्सचा आहे. टाटा मोटर्सने गेल्या वर्षी एप्रिल ते या वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत सुमारे 22000 इलेक्ट्रिक वाहने (EV) विकली आहेत आणि ही संख्या सतत वाढत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी, कंपनीने भारतात आपली EV इकोसिस्टम, Tata uniEVerse तयार केली आहे. ती सध्या टाटा केमिकल्स, टाटा पॉवर, टाटा ऑटो कॉम्पोनंट्स,

क्रोमा आणि टाटा मोटर्स फायनान्स यांसारख्या टाटा मोटर्स समूहाच्या इतर कंपन्यांसोबत ईव्हीचा अवलंब वाढवण्यासाठी काम करत आहे. प्रयत्न करत आहेत.

विवेक श्रीवत्स यांनी आनंद व्यक्त केला

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मार्केटिंग, सेल्स आणि सर्व्हिस स्ट्रॅटेजीचे प्रमुख विवेक श्रीवत्स म्हणाले, “महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांना एका दिवसात 712 ईव्ही पोहोचवण्याचा विक्रम ही आपल्या सर्वांना आनंद देणारी उपलब्धी आहे.

हे केवळ टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांनी वैयक्तिक मोबिलिटी स्पेसमध्ये कसे स्थान कोरले आहे हेच दाखवत नाही, तर ते आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि मूल्य देखील दर्शविते. इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यासाठी सतत जागरूकता करणे.