Electric Cars News : ग्राहक ज्या गाडीच्या प्रतीक्षेत होते ती इलेक्ट्रिक गाडी लॉन्च झाली आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) ची आज नवीन इलेक्ट्रिक कार आज भारतामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. Tata Nexon Max असे या इलेक्ट्रिक गाडीचे नाव आहे.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, आज अखेरीस Tata Nexon Max इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात रु. 17.74 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आली आहे.

या वाहनाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याची रेंज, जी 300 किमीची रिअल-वर्ड रेंज देण्यास सक्षम आहे. Tata Nexon EV च्या अद्ययावत मॉडेलमध्ये अनेक महत्त्वाचे बदल आहेत, ज्यामध्ये मोठा पॅटी पॅक आणि बरेच काही समाविष्ट आहे.

Nexon EV Max दोन प्रकारांमध्ये ऑफर केले आहे – XZ+ आणि XZ+ Lux, ज्यामध्ये Intensity-Teal, Daytona Grey आणि Pristine White यांचा समावेश आहे.

बॅटरी पॅक आणि रेंज

बॅटरी पॅकबद्दल बोलायचे झाल्यास, याला 40.5 kWh बॅटरी पॅक मिळतो, जो एका चार्जवर 437 किमी एआरएआय-प्रमाणित रेंज प्रदान करण्यास सक्षम आहे. दुसरीकडे,

या वाहनाच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्ते याला 140 किमी प्रतितास वेगाने चालवू शकतात. कारची इलेक्ट्रिक मोटर 143 PS कमाल पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क निर्माण करते.