Entertainment August : ऑगस्ट महिना मनोरंजन युगासाठी सर्वोत्तम महिना असणार आहे. या महिन्यात अनेक बड्या स्टार्सचे (big stars) बिग बजेट चित्रपट (Big budget movies) प्रदर्शित होणार आहेत.

बहुतेक चाहते आपल्या आवडत्या स्टार्सच्या (favorite stars) सिनेमांची वाट पाहत असतात. आज आम्ही या रिपोर्टमध्ये त्या चित्रपटांबद्दल (Films) सांगणार आहोत, चला एक नजर टाकूया यादी.

डार्लिंग्स ( Darling )

आलिया भट्ट, शेफाली शाह आणि विजय वर्मा स्टारर ब्लॅक कॉमेडी चित्रपट ५ ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

लाल सिंग चड्ढा

आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत जैन यांनी केले आहे.

रक्षाबंधन (Raksha Bandhan)

अक्षय कुमार स्टारर ‘रक्षाबंधन’ हा सिनेमाही 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आनंद एल राय निर्मित या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर थेट आमीर खानच्या लाल सिंग चड्डाशी टक्कर होणार आहे.

दोबारा (Dobaaraa)

तापसी पन्नू स्टारर ‘दोबारा’ चे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे. हा चित्रपट 19 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला, ज्याला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले.

लाइगर (Liger)

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र आले आहेत. ‘लिगर’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले असून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.