Tiger 3 : सध्या दिवाळीच्या शुभ पर्वावर सलमान खानचा बहुचर्चित टायगर 3 चित्रपट प्रदर्शित झाला असून, सलमान खानच्या या चित्रपटाची पहिल्या दिवसाची 1.99 लाख तिकिटे विकली गेली आहेत. मात्र या चित्रपटाच्या रिलीज आधी सलमान खान याने आपल्या चाहत्यांना एक विनंती केली आहे. याची पोस्ट त्याने आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केली आहे. जाणून घ्या सलमान खान याने काय म्हटले आहे.
सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाबाबत लोकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. त्याच्या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, रिलीजपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सलमान खानने त्याच्या चाहत्यांना विनंती केली आहे.
दरम्यान, सलमान खान याने आपल्या ट्विटरवर शेअर केले आहे की, ‘आम्ही टायगर 3 मोठ्या प्रयत्नांनी आणि उत्कटतेने बनवला आहे. आणि जेव्हा तुम्ही चित्रपट पहाल तेव्हा तो स्पॉईल कारण्याऱ्यांपासून तुम्ही नक्की वाचवाल. स्पॉयलर चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब करू शकतात. यामुळे आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवतो. तुम्ही जे योग्य आहे ते करा.आम्हाला आशा आहे की टायगर 3 तुमच्यासाठी दिवाळी भेट असेल. तर तो उद्या हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
आपला चित्रपट स्पॉईल करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी सलमान खानने ही पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटासाठी जबरदस्त ऑनलाईन बुकिंग झाले आहे.
शनिवारी सकाळपर्यंत ‘टायगर 3’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची 1.99 लाख तिकिटे विकली गेली होती. तर चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 73 हजार तिकिटांची विक्री झाली आहे.