IRCTC Tour Package:- बऱ्याच व्यक्तींना देशातच नाही तर विदेशातील वेगवेगळ्या देशांना भेटी देण्याची इच्छा असते व त्या पद्धतीच्या प्लॅनिंग देखील केल्या जातात. जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत की ते पर्यटनासाठी खूपच उत्तम असून अशा देशांना निसर्गाने भरभरून असे सुंदर वैशिष्ट्ये आणि ठिकाणी दिलेली आहेत. त्यामुळे जगातील अशी बरेच शहरे किंवा देश आहेत की ज्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी असते.
परंतु जर अशा बाहेर देशांमध्ये म्हणजेच विदेशात जर फिरायला जायचे म्हटले म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो व अशा खर्चामुळे बऱ्याच जणांची इच्छा असून देखील फिरायला जाता येत नाही.अशा बाहेर देशाला फिरायला जाण्याची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी आयआरसीटीसीच्या माध्यमातून टूर पॅकेज आयोजित केले जाते व या माध्यमातून तुम्हाला कमी खर्चात फिरता येणे शक्य होते.
अशाच पद्धतीने आयआरसीटीने आता कमी बजेटमध्ये सिंगापूर पॅकेज आणले असून तुम्ही तुमच्या पत्नीसोबत किंवा कुटुंबासोबत सिंगापूरला या पॅकेजेसचा लाभ घेऊन जाऊ शकतात. सिंगापूर हे एक हनिमून डेस्टिनेशन म्हणून देखील ओळखले जाते व मोठ्या प्रमाणावर पर्यटन आणि हनिमूनसाठी सिंगापूरला जाणाऱ्यांची संख्या जास्त असते.
आयआरसीटीसीने आणले सिंगापूरला जाण्यासाठी स्वस्त पॅकेज
IRCTC च्या माध्यमातून सिझलिंग सिंगापूर टूर EX-KOLKATA(EH-037E) नावाचे हे सिंगापूर पॅकेज सादर केले असून हे पॅकेज पाच रात्री आणि सहा दिवसांकरिता आहे. या माध्यमातून प्रवासाला सुरुवात 22 ऑक्टोबर पासून कोलकाता येथून सुरू होणार असून या पॅकेजमध्ये तुम्हाला सिंगापूर आणि क्वालालंपूरच्या अनेक सुंदर अशा ठिकाणांना भेट देता येणार आहे. विशेष म्हणजे या पॅकेजमध्ये तुम्हाला विमानाने प्रवास असणार असून एअर एशिया एअरलाइन्सच्या मदतीने तुम्ही कलकत्त्यावरून क्वालालंपूर मार्गे सिंगापूरला पोहोचणार आहात. विमानाचे इकॉनॉमी क्लासचे तिकीट यामध्ये असणार आहे.
या पॅकेजअंतर्गत मिळतील अनेक सुविधा
या पॅकेजमध्ये सिंगापूर व्हिजा समाविष्ट करण्यात आलेला आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला एका थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे व 3 रात्री तुम्हाला सिंगापूरमध्ये आणि दोन रात्री क्वालालंपूर मध्ये घालवता येणार आहे. तसेच जेवणाचा विचार केला तर यामध्ये नाश्ता तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश करण्यात आला आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्ही सिंगापूर सिटी टूर, ट्राम राईडसह नाईट सफारी, सेंटोसा, केएल सीटी टूर+ केएल टॉवर एन्ट्री तिकीट, बटू लेणी इत्यादींना भेट देता येणार आहे. तसेच पुत्रजया येथील टूर देखील कव्हर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण पॅकेज मध्ये सिंगापूरला तुमच्यासोबत इंग्रजी भाषिक टूर गाईड असेल.
या पॅकेजअंतर्गत तिकीट दर
या पॅकेजमध्ये तुम्हाला एक लाख रुपये पेक्षा जास्त खर्च करावा लागेल. तर तुम्ही सिंगल व्यक्ती करीता हे पॅकेज बुक करत असाल तर तुम्हाला एक लाख वीस हजार सातशे रुपये खर्च येईल. एकापेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा तीन लोकांनी शेअर करून जर हे पॅकेज बुक केले तर त्याकरिता एक लाख एक हजार सातशे रुपये द्यावे लागतील.लहान मुलांकरिता 93 हजार 100 ते 81 हजार 200 रुपये पर्यंत खर्च येईल. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन पद्धतीने हे पॅकेज बुक करू शकता किंवा ऑफलाइन पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या ऑफिसला जाणे गरजेचे आहे. तसेच साठ वर्षापर्यंतच्या प्रवाशांना प्रवास विमा मिळणार आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे या पॅकेजेच्या किमतीमध्ये पाच टक्के जीएसटी देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे.