Bigg Boss 17 : ‘बार डान्सर…30 वर्षाचं बाळ’, मनाराबद्दल केलेल्या कमेंटवर सलमान घेणार ईशाची शाळा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 च्या फिनालेआधी बिग बॉसच्या घरात धमाके पाहायला मिळत आहेत. शोचे स्पर्धक एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. ताज्या एपिसोडमध्ये ईशा मालवीयाने अगदी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मनारा चोप्राला बार डान्सर म्हटले. 19 वर्षांच्या ईशाने मनाराच्या व्यक्तिरेखेचा केवळ कचराच केला नाही, तिच्या वयावरही तिने अनेक टॉन्ट मारले. काय आहे मुद्दा सविस्तर जाणून घेऊया…

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एक टॉर्चर टास्क पार पडला. बिग बॉसने टॉर्चर टास्कमध्ये दोन टीम तयार केल्या होत्या. अभिषेक, मनारा, मुनव्वर आणि अरुण एकाच संघात होते. दुसऱ्या टीममध्ये ईशा, अंकिता, विकी आणि आयशा होते. मुनव्वर यांची टीम टास्कमध्ये प्रथम आली. दुसऱ्या टीमने मुनव्वर, मनारा , अभिषेक आणि अरुण यांच्यावर भरपूर मसाले वापरले. मात्र त्याची संधी येण्यापूर्वीच घरातील सूत्रधार विकी जैन याने घरातील सर्व मसाले लपवून ठेवले. बिग बॉसला ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी या टास्कला रद्द करून मुनव्वरच्या टीमला थेट फायनलिस्ट घोषित केले आणि दुसऱ्या टीमला नॉमिनेट केले.

एकंदरीत, विकी जैनच्या टीमला बिग बॉसचा हा निर्णय आवडला नाही, तेव्हा त्यांनी विरोधी टीम म्हणजेच मुनव्वच्या टीम वर शाब्दिक हल्ला करायला सुरुवात केली, यावेळी ईशाने मनाराला टार्गेट केले, आणि तिला तू चार लोकांचा पदर पकडून फिनालेपर्यंत पोहोचली असे म्हंटले, तू शोमध्ये काय केले आहे? यावर मनारा म्हणते की तू पण अंकिता आणि विकी भैयाचा हात धरून इथेपर्यंत आली आहेस.

यानंतर जेव्हा ईशा, मनाराला खूप काही बोलू लागते तेव्हा मनारा तिला चिडवण्यासाठी डान्स करू लागते. यावर ईशा तिला, म्हणते बार डान्सर, ईशाच्या या कमेंटने मनाराला धक्का बसतो, पुढे अभिषेक देखील ईशाला तिच्या कमेंटवर ओरडताना दिसतो, तरीही ईशा ऐकत नाही आणि ती पुढे अजून बोलू लागते, पुढे ईशा मनाराला 30 वर्षांच लहान बाळ म्हणून देखील चिडवते, ईशाच्या या वागण्यावर सलमान खान तिला विकेंड का वार मध्ये खूप ओरडताना दिसत आहे.

खरं तर बिग बॉस हा एक गेम शो आहे, जिथे काही लोक मनापासून खेळून खरे नाते निर्माण करतात. तर काही वेळेला शोमध्ये भांडणे सर्रास होताना दिसतात. मात्र एका कॉन्स्टेबलला बार डान्सर म्हणत त्यांचा अपमान करणे चुकीचे आहे.

ईशाला एखाद्या टास्कसाठी किंवा फक्त फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी मनाराबद्दल इतके बोलण्याचा अधिकार नव्हता. जर मनारा ऐवजी ईशा फिनालेमध्ये असती तर मग तिने आनंद साजरा केला नासता का? असा प्रश्न देखील उपस्थित केला.

ईशाने मनाराला ज्या प्रकारे चांगले-वाईट म्हटले आहे, त्यावरून अनेक सेलेब्स मनाराच्या समर्थनात उतरले आहेत. असभ्य कमेंटसाठी चाहते ईशाला ट्रोल करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर आता सलमान कशी कारवाई करतो हे पाहणे बाकी आहे.