मनोरंजन

Dunki Release Date : प्रतीक्षा संपली! ‘डंकी’ सिनेमाची रिलीज डेट व पोस्टर रिलीज, किंग खान करणार ‘ही’ भूमिका, वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

‘जवान’ या चित्रपटाच्या यशामुळे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान खूश आहे. आता तो आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट घेऊन येत आहे. यावर्षी त्याने ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. डिसेंबरमध्ये ‘डंकी’ प्रदर्शित होऊन तो या वर्षाची सांगता करणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर जारी केले आहे आणि चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘डंकी’ चर्चेत आहे.

शाहरुख खानचा ‘डंकी’ आणि दाक्षिणात्य स्टार प्रभासचा ‘सालार’ एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहेत अशी चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘डंकी’ चेनवीन पोस्टर रिलीज झाला आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

शाहरुख खानचा ‘डंकी’ हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये शाहरुख खान एका सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे. पोस्टरसोबत च्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एक सैनिक अपना वादा कभी नहीं भूलता”. याचाच अर्थ प्रभासच्या ‘सालार’सोबत शाहरुख खानचा ‘डंकी’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार नाही. दोन्ही सिनेमे चांगली कमाई करतील.

चित्रपटाची कथा ‘जवान’ आणि ‘पठाण’पेक्षा वेगळी असेल. नवीन पोस्टरमध्ये शाहरुखची एक सैनिकाची भूमिका समोर आली आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाची कथा ‘जवान’ आणि ‘पठाण’पेक्षा खूपच वेगळी आहे.

शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटात त्याच्याशिवाय तापसी पन्नू, दिया मिर्झा आणि बोमन इराणी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटात विकी कौशल कॅमिओ करणार असल्याची चर्चा आहे. प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रुती हसन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Ahmednagarlive24 Office