शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशहा आहे. परंतु त्याच्या पत्नीचा गौरीचा सध्या तरी बॉलिवूडशी काही संबंध नाही. असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या पत्नीचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. यातील अनेकांनी आधी चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु नंतर त्यापासून त्या दूरच राहिल्या. परंतु या महिला पैसे कमविण्याच्या बाबतीत आजही आपल्या पतीला टक्कर देतात.
त्यापैकीच एक नाव म्हणजे शाहरुख खानची पत्नी गौरी खान. पतीच्या बळावर नव्हे, तर कर्तृत्वाच्या जोरावर तिने आपला ठसा उमटवला आहे. शाहरुख खान इंडस्ट्रीचा बादशहा आहे आणि गौरी बिझनेसवुमन आहे. तिने आपल्या क्षेत्रात खूप नाव कमावले आहे.
आज गौरी खानचा वाढदिवस आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची पत्नी गौरीचा आज 53 वा वाढदिवस आहे. तिचा जन्म 8 ऑक्टोबर 1970 रोजी दिल्लीत झाला. गौरीचे शिक्षण दिल्लीत झाले. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून इतिहासविषयात बीए केले आहे. यानंतर तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (निफ्ट) मधून 6 महिन्यांचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला, मात्र नंतर तिने फॅशन नव्हे तर इंटिरिअर डिझायनिंग केले आणि आज ती पैसे कमावण्याच्या बाबतीत पती शाहरुख खानला टक्कर देते.
शाहरुख खान आणि गौरी खान यांनी 1991 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर लगेचच ती पतीसोबत मुंबईला स्थायिक झाली. 2002 मध्ये त्यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन कंपनीची स्थापना केली आणि निर्माता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘मैं हूं ना’ हा आला होता. याचे दिग्दर्शन फराह खान यांनी केले होते. या चित्रपटात शाहरुख खान, अमृता सिंग आणि सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत आहेत. त्यानंतर त्यांनी ‘रईस’ आणि ‘जवान’ सारखे सिनेमे केले. ते सुपरहिट राहिले.
गौरीने सर्वप्रथम ‘मन्नत’चे इंटिरिअर डिझाइन केले होते. 2001 मध्ये हे घर विकत घेतल्यानंतर शाहरुख कडे इंटेरिअर साठी पैसे नव्हते. गौरीने आपल्या हुशारीने ते सजवले, ज्याची बरीच चर्चा झाली. यानंतर गौरीने हा आपला छंद व्यवसायात बदलला. 2010 मध्ये तिने आपली मैत्रीण सुझान खानसोबत द चारकोल प्रोजेक्ट फाऊंडेशन ची सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी मुंबईतील वरळी येथे डिझाइन सेल नावाचे पहिले कॉन्सेप्ट स्टोअर उघडले. त्यानंतर तीन वर्षांनी ‘गौरी खान डिझाइन्स’ स्टुडिओही सुरू केला. आतापर्यंत तिने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची घरं डिझाइन केली आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे घर अँटिलियाही तिनेच इंटीरियर केले आहे.
प्रॉडक्शन हाऊस आणि डिझाइन कंपनीव्यतिरिक्त गौरी खान पती शाहरुख खानसोबत दुबईत बिझनेस करते. रिपोर्ट्सनुसार, दुबईमध्ये त्यांचा 18 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. 2008 मध्ये, किंग खानने स्वत: त्या व्यवसायाबद्दल खुलासा केला होता. दुबई बीचसमोरील रेसिडेंशिअल कॉम्प्लेक्स साठी युएईस्थित रिअल इस्टेट कंपनीशी भागीदारी केली. ते सध्या SRK Boulevard नावाने ओळखले जाते. दुबईतील रास अल खैमा येथील डाना बेटावर आहे. हे दहा निवासी इमारतींचा समूह असून त्याची किंमत सुमारे 18 हजार कोटी रुपये आहे.
गौरी खानच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर लाइफस्टाइल एशियानुसार तिच्याकडे जवळपास 1600 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. तिचे 150 कोटी रुपयांचे एक दुकान आहे, जे तिच्या मालकीचे आहे. गौरी बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार विवाहित जोडप्यांपैकी एक आहे. मुंबई, दिल्ली, अलिबाग, लंडन, दुबई, लॉस एंजेलिस आदी ठिकाणी कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. बेंटले कॉन्टिनेंटल जीटीसारख्या अनेक आलिशान गाड्याही आहेत.