भारतात दोन ऑटो दिग्गज कंपन्या लवकरच 2 नवीन SUV कार लाँच करणार आहेत. ह्युंदाई आणि टाटा कंपनी लवकरच भारतीय मार्केटमध्ये दोन मायक्रो एसयूव्ही लॉन्च करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
खरे तर भारतीय कार बाजारात गेल्या काही वर्षांपासून सेडान कारऐवजी SUV कारला अधिक मागणी आली आहे. प्रामुख्याने तरुण वर्गात एसयूव्ही कारची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक दिग्गज कंपन्यानी आता एसयूव्ही कारच्या प्रोडक्शनवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान जर तुम्ही ही नजीकच्या काळात SUV कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे. आज आपण ह्युंदाई आणि टाटा कंपनीच्या लवकरच लॉन्च होणाऱ्या दोन नवीन एसयूव्ही कारची माहिती पाहणार आहोत.
टाटा पंच फेसलिफ्ट :
टाटा ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये टाटा पंच या गाडीचा देखील समावेश होतो. Tata Punch या गाडीची लोकप्रियता गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खरे तर ही गाडी ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीने लॉन्च केली. जेव्हा ही गाडी लॉन्च झाली तेव्हापासूनच ही गाडी चर्चेत आहे.
ही गाडी अनेक महिने टॉप सेलिंग कार्सच्या यादीत टॉपवर राहिली आहे. या गाडीची लोकप्रियता पाहता कंपनीने या गाडीचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील बाजारात आणले आहे. विशेष म्हणजे आता या गाडीचे फेसलिफ्ट मॉडेल देखील लाँच होणार आहे. येत्या काही महिन्यांनी टाटा कंपनी टाटा पंच फेसलिफ्ट बाजारात लॉन्च करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. ज्याप्रमाणे Tata Punch च्या ICE आणि इलेक्ट्रिक व्हर्जनला ग्राहकांकडून रिस्पॉन्स मिळाला आहे तसाच रिस्पॉन्स टाटा पंच फेसलिफ्ट या अपडेटेड व्हर्जनला देखील मिळणार अशी आशा कंपनीकडून व्यक्त होत आहे.
ह्युंदाई एक्स्टर:
ह्युंदाई लवकरच एक एसयुव्ही कार लॉन्च करणार आहे. खरेतर कंपनीने नुकतेच बुसान इंटरनॅशनल मोबिलिटी शो 2024 मध्ये आगामी ऑल-इलेक्ट्रिक इंस्टरचा खुलासा केला होता. ही Hyundai कंपनीची आगामी SUV इलेक्ट्रिक कार म्हणजे ह्युंदाई एक्स्टरआपल्या ग्राहकांना एका चार्जवर 355 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते, असा दावा देखील कंपनीकडून केला जात आहे.
खरे तर सद्यस्थितीला आपल्या देशात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा बोलबाला आहे. टाटा कंपनीने सर्वाधिक इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात टाटा आणखी काही इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात उतरवणार आहे. दरम्यान, आता टाटा कंपनीच्या या मक्तेदारीला आव्हान मिळणार आहे.
कारण आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च होत आहेत. हुंदाई कंपनीची एक्स्टर ही कार देखील येत्या काही महिन्यांनी भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च केली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, ह्युंदाई कंपनीची ही आगामी मायक्रो इलेक्ट्रिक SUV भारतात 2026 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते.