Highest Earning Bollywood Films In Pakistan : बॉलीवूडच्या या टॉप १० चित्रपटांनी पाकिस्तानातून केली आहे कोट्यवधींची बक्कळ कमाई, पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Highest Earning Bollywood Films In Pakistan : भारतामध्ये बॉलीवूड चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. तसेच भारतातच नाही तर जगभरात बॉलीवूड चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र असे काही १० चित्रपट आहेत ज्यांनी भारतात नाही तर पाकिस्तानातून जास्त कमाई केली आहे.

तुम्ही कधी याबद्दल विचार देखील केला नसेल. मात्र भारताचे असे काही टॉप १० चित्रपट आहेत ज्यांनी पाकिस्तानमधून सर्वाधिक कमाई केली आहे. सलमान खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन किंवा शाहरुख आणि आमिर खानच्या चित्रपटांना पाकिस्तानमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नेहमी दिसते.

चला तर मग जाणून घेऊया पाकिस्तानमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांची यादी-

1. संजू – 2018

बॉलीवूडमधील संजू हा चित्रपट पाकिस्तानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. बॉलीवूडच्या संजू चित्रपटाने पाकिस्तानी बॉक्स ऑफिसवर 37.60 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला रणबीर कपूर, विकी कौशल आणि परेश रावल यांची भूमिका पाहायला मिळेल.

2. सुलतान – 2016

पाकिस्तानच्या बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करण्यास सुलतान चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटामध्ये सलमान खानने कुस्तीपटूची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने 33 कोटींची कमाई पाकिस्तनमधून केली आहे.

3. धूम 3 – 2013

2013 मध्ये प्रदर्शित झालेला धूम 3 चित्रपट पाकिस्तानमध्ये चांगलाच हिट झाला होता. यामध्ये आमिर खानने चोराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये 25 कोटींची कमाई केली होती.

4. बजरंगी भाईजान – 2015

सलमान खानचा बजरंगी भाईजान हा चित्रपट देखील पाकिस्तानमध्ये अधिक लोकप्रिय झाला होता. दोन्ही देशांमधील मैत्री वाढवणाऱ्या या चित्रपटाची कथा खूप आवडली. या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये जवळपास 23 कोटींची कमाई केली होती.

5. पीके – 2014

आमिर खानच्या पीके चित्रपटाने देखील पाकिस्तानमध्ये चांगली कमाई केली आहे. धार्मिक अंधश्रद्धेच्या विरोधात हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये 22 कोटींची कमाई केली होती.

6. दिलवाले – 2015

शाहरुख खानच्या चित्रपटांना भारतातच नाही तर विदेशात देखील जोरदार प्रतिसाद मिळत असतो. शाहरुख खान आणि काजोल ही जोडी अनेकदा सुपरहिट ठरली आहे. त्यांच्या दिलवाले या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये 20 कोटींची कमाई केली होती.

7. वेलकम बॅक – 2015

जॉन अब्राहम, नाना पाटेकर, अनिल कपूर, नसीरुद्दीन शाह, परेश रावल यांच्यासह अनेक स्टार्स असलेल्या या चित्रपटाने पाकिस्तानमध्येही चांगली कमाई केली. या चित्रपटाने 2015 मध्ये जवळपास 9.5 कोटींची कमाई केली होती.

8. बाजीराव मस्तानी – 2015

बाजीराव मस्तानी हा चित्रपट भारतातच नाही तर जगभरात अधिक लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाने भारताबाहेर देखील बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने पाकिस्तानी बॉक्स ऑफिसवर जवळपास 9 कोटींची कमाई केली होती.

9. प्रेम रतन धन पायो – 2015

प्रेम रतन धन पायो या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली नसली तरी पाकिस्तानमध्ये या छोत्रपटाला चांगली लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये 8.80 कोटींची कमाई केली आहे.

10. तमाशा – 2015

रणबीर कपूर यांचा तमाशा या चित्रपटाने देखील पाकिस्तानमध्ये चांगली कमाई केल्याचे पाहायला मिळाले. रणबीरने हा सिनेमा दीपिका पदुकोणच्या तमाशा चित्रपटाने पाकिस्तानमध्ये 8.50 कोटींची कमाई केली आहे.