KL Rahul : सुनील शेट्टीने का दिला जावई केएल राहुलला इशारा? जाणून घ्या नेमकं प्रकरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

KL Rahul : गेल्या काही महिन्यांपूर्वीच सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल लग्नबंधनात अडकले आहेत. तसेच सुनील शेट्टी यांनी त्यांच्या मुलीला केएल राहुलसारखा नवरा भेटल्याने धन्य झाल्याचे म्हंटले होते.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी

केएल राहुल आणि अथिया शेट्टी 23 जानेवारीला सुनीलच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न केले. हे लग्न करण्यापूर्वी केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे एकमेकांना डेट करत होते. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचे लग्न हे कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसह निवडक लोकांच्यात झाले आहे.

सुनील शेट्टीने मुलीला सल्ला दिला

सुनील शेट्टीने त्याची मुलगी अथिया शेट्टी हिला एका मुलाखतीमध्ये सल्ला दिला आहे. सुनील शेट्टी यांनी सांगितले की, इंडस्ट्रीत प्रवेश केल्यावर यशाची भीती बाळगू नको असे सांगितले होते आणि ती अपयशाला सामोरे जाण्यास तयार आहे का असे देखील तिला विचारले होते.

तसेच सुनील शेट्टी याने पुढे मुलीला जोडीदारावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यास सांगितले. तसेच तुमचा जोडीदार देखील तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारा असावा असे देखील सांगितले आहे.

मुलीला त्याने पुढे सांगितले की, तो एक क्रिकेटर आहे अभिनेत्यासारखेच त्याच्या जीवनात देखील उतार चढाव येऊ शकतात. त्यामुळे कायम त्याच्या सोबत राहिले पाहिजे. माझ्या काळात मी सुनील गावसकर यांच्यावर विश्वास ठेवला त्यामुळे मरेपर्यंत ते माझे हिरो राहतील.

सुनील शेट्टीने केएल राहुलला दिला इशारा

सुनील शेट्टीने बोलताना त्याचा जावई क्रिकेटर केएल राहुलला इशारा दिला आहे. तो म्हणाला, “एवढी सुंदर व्यक्ती बनू नकोस की जेव्हा तुमच्याशी संबंध येतो तेव्हा आम्हाला कमीपणाचे वाटू लागते. तुम्ही इतका चांगला मुलगा होऊ शकत नाही की प्रत्येकाला असे वाटते की चांगुलपणा तुमच्यात नाही तर त्याच्यात आहे, हा असा मुलगा आहे. मी अथियाला नेहमी सांगतो की तू धन्य आहेस.

सुनील शेट्टीचे आगामी चित्रपट

सुनील शेट्टी Zee5 च्या ऑपरेशन फ्राइडेमध्ये दिसला होता. तो पुढे बहुप्रतिक्षित ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटात दिसणार आहे जिथे तो श्यामच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे.