Popular actor of Ramayana : रामानंद सागर यांच्या रामायणातील लोकप्रिय २२ कलाकार आज कुठे आहे आणि काय करतात? जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Content Team
Updated:
Popular actor of Ramayana

Popular actor of Ramayana : सध्या आदिपुरुष चित्रपट फारच चर्चेत आहे. ओम राऊत निर्मित 600 कोटी खर्च करून आदिपुरुष हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. मात्र या चित्रपटावर सध्या जोरदार टीका होत आहे. आदिपुरुष चित्रपटातील पात्रे आणि त्यातील कथेमुळे अनेकजण नाराज आहेत.

त्यामुळे सध्या चाहत्यांना रामानंद सागर यांचे ‘रामायण’ आठवत आहे. रामानंद सागर यांचे रामायण त्यावेळी खूपच प्रसिद्ध झाले होते. तसेच आजही ते अनेकांना आठवत आहे. त्यांच्या या रामायणाने टीव्ही जगतात इतिहास रचला होता. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या रामायणाची लोकप्रियता आजही कायम आहे.

रामानंद सागर यांच्या यांनी यांच्या रामायणातील कलाकार देखील त्यावेळी खूपच प्रसिद्ध झाले होते. तसेच आज हे कलाकार कुठे आहेत आणि काय करत आहेत याबद्दल जाणून घेऊया.

1. प्रेम – मयुरेश क्षेराड्डे

मयुरेश क्षेराड्डे यांनी देखील रामायणामध्ये चांगली भूमिका साकारली होती. त्यांनी श्रीरामाच्या धाकट्या मुलाची म्हणजेच प्रेमाची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्यांचे वय ११ वर्षे होते. आता ते ४६ वर्षांचे झाले आहेत. १९९९ मध्ये मयुरेश क्षेराड्डे यांनी अभिनय सोडून अमेरिकेला गेले होते. ते सध्या न्यू जर्सी येथे राहतात आणि एका कंपनीचे सीईओ देखील आहेत.

2. गुरु वशिष्ठ – सुधीर दळवी

सुधीर दळवी यांनी ४८ व्या वर्षी गुरु वशिष्ठ यांची रामायणामध्ये भूमिका साकारली होती. सध्या चित्रपट सृष्टीमध्ये काम करत आहेत. आत त्यांचे वय ८५ वर्षे आहे. 1977 मध्ये आलेल्या शिर्डी के साई बाबा या चित्रपटातही त्यांनी साईबाबांची भूमिका साकारली होती.

3. कुश – स्वप्नील जोशी

अभिनेता स्वप्नील जोशी हा तर तुम्हाला माहितीच असेल. स्वप्नील जोशीने देखील रामायणामध्ये कुश ची भूमिका साकारली होती. त्यानंतरच स्वप्नील जोशी चित्रपट क्षेत्रामध्ये जोडला गेला. सध्या तो मराठी चित्रपटांमध्ये जास्त सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

4. राजा दशरथ – बाळ धुरी

रामायणामध्ये राजा दशरथची भूमिका साकारणारे बाळ धुरी हे सध्या ७८ वर्षांचे आहेत. बाळ धुरी यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या यादीत देखील असल्याचे पाहायला मिळते.

5. आई कौशल्या- जयश्री गडकर

दशरथची पत्नी म्हणून रामायणामध्ये कौशल्याची भूमिका साकारणारी जयश्री गडकर खऱ्या आयुष्यात बाळ धुरीची पत्नी आहे. जयश्री गडकर सध्या या जगात नसल्या तरी त्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव केले आहे.

6. कैकेयी – पद्मा खन्ना

पद्मा खन्ना यांना रामानंद सागर यांच्या रामायणात कैकेयी या भूमिकेपासून चित्रपट क्षेत्रात ओळख मिळाली. यानंतर त्यांनी सौदागर चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील काम केले आहे. पद्मा खन्ना सध्या 74 वर्षांच्या झाल्या आहेत.

7. राजा जनक – मूलराज राजदा

मुलराज हे प्रसिद्ध लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक हिंदी, गुजराती चित्रपट तसेच टीव्ही शोमध्ये काम केले. रामायणात त्यांनी सीतेचे वडील जनक यांची भूमिका साकारली होती. 23 सप्टेंबर 2012 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

8. विभीषण – मुकेश रावल

रावणाचा भाऊ विभीषणाची भूमिका मुकेश रावल यांनी रामायणामध्ये साकारली होती. त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 15 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

9. सुग्रीव/बली: श्याम सुंदर कलानी

रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेमध्ये श्याम सुंदर कलानी यांनी सुग्रीवची भूमिका साकारली होती. आजरामुळे त्यांचे एप्रिल 2020 मध्ये निधन झाले.

10. मेघनाद – विजय अरोरा

विजय अरोरा यांच्या कारकिर्दीसाठी रामायण संजीवनीसारखे ठरले. काही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर त्याला अनेक प्रमुख भूमिका साकारायला मिळाल्या पण नंतर त्यांना काम मिळणे बंद झाले. त्यानंतर त्याने रामायणातील रावणाचा मुलगा मेघनाद (इंद्रजीत) या व्यक्तिरेखेने आपली कारकीर्द पुन्हा सुरू केली. त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. पोटाच्या कर्करोगामुळे 2 फेब्रुवारी 2007 रोजी विजय यांचे निधन झाले.

11. भरत – संजय जोग

संजय जोग यांनी रामायण या मालिकेमध्ये रामाचा भाऊ भरतची भूमिका साकारली होती. 27 नोव्हेंबर 1995 रोजी वयाच्या 40 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

12. कुंभकरण – नलिन दवे

नलिन दवे यांनी रामायण या मालिकेमध्ये कुंभकरणाची भूमिका साकारली होती. नलिन दवे गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९० मध्ये त्यांनी वयाच्या 50 व्या जगाचा निरोप घेतला.

13. मारीच – रमेश गोयल

वयाच्या ३० व्या वर्षी मामा मारीचची भूमिका साकारणारे रमेश गोयल आता ६५ वर्षांचे आहेत. सरफरोश, सलाम बॉम्बे, हम हैं राही प्यार के यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

14. जामवंत – राज शेखर उपाध्याय

राज शेखर उपाध्याय यांनी रामायण या मालीकेमध्ये जामवंतची भूमिका साकारली होती. जामवंत या व्यक्तिरेखेने राजशेखर उपाध्याय खूप प्रसिद्ध मिळाली.

15. अंगद – बशीर खान

बशीर खान यांनी रामायण या मालीकेमध्ये अंगदची भूमिका साकारली होती. बशीर खान मुंबईत राहतो, त्याने आपल्या करिअरची सुरुवात रामानंद सागर यांच्या टीव्ही सीरियल विक्रम और बेतालमधून केली होती.

16. शबरी – सरिता देवी

रामायणात शबरीची भूमिका साकारणाऱ्या सरिता देवी यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1925 रोजी जोधपूरमध्ये झाला. सरिता या राजस्थानची पहिल्या चरित्र अभिनेत्री होत्या. स्वातंत्र्याच्या वर्षी म्हणजे 1947 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.

‘तोहफा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटात त्यांनी नायिका अनुराधाच्या आईची भूमिका साकारली होती. येथून त्यांच्या चित्रपट प्रवासाची प्रक्रिया सुरू झाली. 2001 मध्ये सरिता देवींनी या जगाचा निरोप घेतला.

17. मंथरा – ललिता पवार

ललिता पवार यांनी रामायण या मालीकेमध्ये मंथराची भूमिका साकारली होती. ललिता पवार यांनी नवव्या वर्षी सिनेमा सृष्टीतील प्रवास सुरु केला. त्यांचा जन्म 18 एप्रिल 1961 रोजी नाशिक येथे झाला. आणि १९९८ मध्ये त्यांचे निधन झाले.

18. शत्रुघ्न – समीर राजदा

रामायणात रामाचा धाकटा भाऊ शत्रुघ्नची भूमिका करणारा समीर राजदा हा मूलराज राजदाचा मुलगा आहे. या मालिकेत मूलराजने राजा जनकाची भूमिका साकारली होती. समीरचे वय आता ६० वर्षे आहे.

19. श्री हनुमान – दारा सिंह

रामायण या मालिकेमध्ये श्री हनुमानाची भूमिका दारा सिंह यांनी साकारली होती. त्यामुळे तेव्हापासून ते अधिकच लोकप्रिय झाले. दारा सिंह यांचे १२ जुलै २०१२ रोजी निधन झाले.

20. मंदोदरी – अपराजिता भूषण

अपराजिता भूषण यांनी रामायणात मंदोदरीची भूमिका साकारली होती. त्या ज्येष्ठ अभिनेते भारत भूषण यांची मुलगी आहे. मंदोदरीच्या व्यक्तिरेखेतील अपराजिताच्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांवर खोलवर छाप पाडली.

21. शूर्पणखा – रेणू धारिवाल

रेणू धारिवाल यांनी रामायण मालिकेमध्ये शूर्पणखाची भूमिका साकारली होती. आता सध्या त्या ५८ वर्षाच्या आहेत. या ठिकाणी प्रसिद्धी भेटल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला.

22. रावण – अरविंद त्रिवेदी

रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेमध्ये अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका साकारली होती. इंदूरचे रहिवासी अरविंद टीव्हीच्या आधी ते गुजराती चित्रपटांमध्ये जास्त सक्रिय होते. 2021 मध्ये वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe