Singham Aagin : हवेत उडणारी वाहने… जळत्या गाड्या… आणि हवेत धूर… असे दृश्य रोहित शेट्टीच्या चित्रपटात नसणे म्हणजे एक अशक्य गोष्ट आहे. रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रोहित शेट्टीने हे फोटो शेअर करताच ते वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना सिंघम, सिंघम रिटर्न पाठोपाठ आता सिंघम अगेन ची मजा पहायला मिळणार हे नक्की झालं आहे. विशेष म्हणजे यात अजय देवगण सोबतच अक्षय कुमार, रणवीर , दीपिका आणि टायगर श्रॉफ दिसणार आहे.
‘सिंघम अगेन’ची झलक
हे फोटो शेअर करताना रोहित शेट्टीने अप्रतिम कॅप्शनमध्ये लिहिलं- ‘वर्क इन प्रोगेस…सिंघम अगेन’… रोहित शेट्टीने एक फोटो शेअर केला आहे. पण त्याचा चेहरा दिसत नाही. पाठी मागील बाजूने तो दिसत आहे.
स्टार्स
‘सिंघम अगेन’, ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या चित्रपटांद्वारे आपला चित्रपट मोठ्या उंचीवर नेण्याचा रोहित शेट्टीचा आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि दीपिका पदुकोण यांच्याप्रमुख भूमिका आहेत. नुकताच दीपिकाचा लूकही समोर आला होता, ज्यात ती पोलिसांच्या गणवेशात दिसली होती आणि तिचे नाव होते- शक्ती.
दोन स्टार्सना मिळाली एन्ट्री
‘सिंघम अगेन’ या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. टायगर श्रॉफ नुकताच ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पायजमा मध्ये दिसला. तसेच त्याने हातात बंदूक घेतलेली दिसली. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे. ही चित्रपटाची संभाव्य तारीख आहे.
मागील दोन सिनेमे सुपरहिट
सिंघम व सिंघम रिटर्न हे दोन्ही सिनेमे खूप चालले. दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. सिंघम मधील सर्व डायलॉग आजही फेमस आहेत. आता हा अनेक स्टार्स सोबत घेत केलेला प्रयोग किती सक्सेस होईल हे येणार कालच सांगेल. परंतु एकंदरीत रोहित शेट्टीचा इतिहास पाहता हा सिनेमा एक मनोरंजनाचा खजिना असेल अशी आशा आहे.