Thalapthy Vijay Networth : सिनेसृष्टीची जादू अप्रतिम आहे. काही कलाकार कामासाठी धडपडतात तर काही चित्रपटांसाठी शेकडो कोटी रुपये मानधन घेतात. सलमान खान, शाहरुख खानपासून रजनीकांतपर्यंत अनेक कलाकार चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी १०० कोटी रुपये घेतात.
यातील बहुतेकांनी आपल्या करिअरची सुरुवात छोट्या छोट्या नोकऱ्यांपासून केली होती. आज या लोकांनी आपल्या आयुष्यात एक वेगळं स्थान मिळवलं आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगत आहोत ज्याने वयाच्या १९ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली.
आज तो सुपरस्टार बनला आहे. व एका चित्रपटासाठी २०० कोटी रुपये घेतो. या हिरोचे नाव आहे विजय थालापती. या हिरोने कधी काळी दिग्दर्शकांचे फटकेही खाल्ले आहेत. आज या सुपरस्टारची नेटवर्थ पाहून थक्क व्हाल.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद:-विजय थालापती या दाक्षिणात्य सुपरस्टारची मोठी फॅन फॉलोइंग आहे. नुकत्याच आलेल्या ‘लिओ’ या चित्रपटासाठी त्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे.
एका मुलाखतीत अभिनेता पोनम्बलमने थलापति विजयच्या आयुष्याशी संबंधित तपशील शेअर केला होता आणि सांगितले होते की, विजयला चित्रपटाच्या सेटवर थप्पड मारण्यात आली होती. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, सुरुवातीला दिग्दर्शक हे थलापति विजयसोबत काम करण्यास टाळाटाळ करत होता. त्यानंतर मग त्यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी आपल्या मुलाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रोड्यूसची जबाबदारी स्वीकारली.
वडिलांनी थप्पड मारली:-सेंथूरप्पंडी च्या सेटवरची आठवण सांगताना ते म्हणाले की, विजय त्यावेळी फक्त १९ वर्षांचा होता. त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी संपूर्ण टीमसमोर त्याला थप्पड मारली. पोन्नम्बलम म्हणाले की, चंद्रशेखर यांना आपला मुलगा थलापति विजय सुपरस्टार व्हावा अशी इच्छा होती.
त्याची त्याला चिंता सतावत होती. २०१७ मध्ये एका मुलाखतीत चंद्रशेखर म्हणाले होते की, वयाच्या १० व्या वर्षी विजयला अभिनेता-निर्माते पीएस वीरप्पा यांनी चित्रपटातील अभिनयासाठी ५०० रुपये दिले होते.
ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे:-थलापति विजयच्या आयुष्याची ही कहाणी सिनेसृष्टीत फार कमी लोकांना माहित आहे. आज तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘लिओ’ चित्रपटासाठी त्याला २०० कोटी रुपयांची मोठी फी मिळाली आहे. तो सर्वात बॅंकेबल अभिनेत्यांपैकी एक आहे.
त्यांची एकूण संपत्ती 420 कोटी रुपये आहे. लोकेश कनंगराज दिग्दर्शित लिओ या चित्रपटात थलापति विजय, संजय दत्त आणि तृषा कृष्णन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने एका आठवड्यात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.