दोन दिवस बेशुद्ध, मग मृत्यू त्यानंतर सात मिनिटांनी झाला जिवंत !

Pragati
Published:
afterlife

एखादा व्यक्ती मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाल्याचे तुम्ही चित्रपटात पाहिले असेल. मात्र अशा गोष्टी प्रत्यक्षात घडणे शक्य नाही, हे आपल्याला माहिती आहे. पण तरीही एका व्यक्तीने आपला मृत्यू होऊनही आपण जिवंत झाल्याचा दावा केला असून आपण मृत्यूनंतर ७ मिनिटांनी जिवंत झाल्याचे म्हटले आहे. हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

या व्यक्तीने मृत्यू झाल्यानंतर काय होते याचे सर्व अनुभव सांगितले आहेत. सोशल मीडियावर सात महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आली की, जे लोक मृत्यू होऊन पुन्हा जिवंत होतात, त्यांनी काय अनुभवले ते सांगावे. त्यानंतर पोस्ट व्हायरल झाली आणि शेकडो लोकांनी त्यांचे मृत्यू संबंधीचे अनुभव सांगितले.

मात्र एका व्यक्तीने सांगितलेला अनुभव धक्कादायक होता. दोन दिवस तो शुद्धीत नव्हता. त्यानंतर त्याला पुन्हा शुद्ध आली. जाग आल्यावर त्याने विचारले काय झाले ? त्याच्या शरीरात काय सुरू आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. पण त्याने जे काही अनुभवले ते त्याला आठवत होते.

व्यक्तीने सांगितले की, माझ्यासमोर तीन गोल होते, जे अंडाकृती आकाराचे होते. काळ्याकुट्ट अंधारात हे तीन गोल एक एक करत समोर दिसत होते. पहिल्या गोलमध्ये मला पर्वत, तलाव, जंगल आणि आकाश दिसले. त्यानंतर त्यांचा रंग कमी होऊन तो पिवळा झाला.

तेवढ्यात आणखी एक गोल आला, जो गरम लोखंडी रिंगचा होता. ते इतके गरम होते की, लोखंडही वितळून खाली पडत होते. त्या वितळणाऱ्या लोखंडाचा वासही येत होता. त्यानंतर त्याला एका नर्सने सांगितले की, रक्ताचा वासही तसाच आहे.

त्यानंतर त्यांच्यासमोर तिसरा गोल दिसला. यात सुंदर ढग होते, त्यांचा रंग निळा आणि गुलाबी होता. व्यक्ती म्हणाला की, मी एक ज्योतिषी आहे आणि मी त्या गोलांचे आकलन केले आहे. यामुळे मला नेमकं काय दिसले ते समजले.

तो सतत ग्रहांबद्दल अभ्यास करत असतो, म्हणून जेव्हा तो बेशुद्ध झाला तेव्हा त्याच्या मेंदूने त्याला तोच आकार दाखवला. कारण ग्रहांच्या कक्षादेखील अंडाकृती आकाराच्या आहेत.

पहिला व दुसरा गोल ग्रह आणि निसर्गाच्या सौंदर्याबद्दल होता. दुसरा गोल रक्ताशी संबंधीत होता. जेव्हा रक्ताचा वास त्यांच्या मनापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्यांचा मेंदू त्यांना त्याच पद्धतीने दाखवत असतो. त्यांचे बोलणे ऐकून लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe