Upcoming Movies 2024 : देशाती चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्यांचे दमदार चित्रपट सादर करण्यात येत आहेत. 2023 या वर्षात देखील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवले आहे. आता येत्या 2024 या वर्षात अनेक नवीन चित्रपट येणार आहेत.
फायटर
2024 या वर्षात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा फायटर हा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला असेल. हा चित्रपट भारतीय वायू सेनेवर आधारित असेल. चित्रपटाचा टिझर देखील रिलीज झाला आहे. 25 जानेवारी 2024 हा चित्रपट रिलीज होणार आहे.
मैं अटल हूं
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर मैं अटल हूं हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. पंकज त्रिपाठी हे अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहेत. रवी जाधव यांनी हा चित्रपट दिगदर्शित केला आहे.
मेरी ख्रिसमस
दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा मेरी ख्रिसमस हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रकशित होणार आहे. या चित्रपटाचा टिझर देखील रिलीज करण्यात आला आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांनी या चित्रपटात काम केले आहे.
सिंघम अगेन
दिग्दर्शक रोहित शेट्टी हे त्यांचा सिंघम अगेन हा चित्रपट रिलीज करणार आहेत. चाहते त्यांच्या या चित्रपटाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये करीना कपूर, अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि दीपिका पदुकोण हे सर्वजण दिसतील. सिंघम अगेन हा 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
योधा
सिद्धार्थ मल्होत्रा यांचा शेरशाह चित्रपट गाजल्यानंतर आता ते योधा या चित्रपटामध्ये देखील दिसणार आहेत. त्यांची या चित्रपटामध्ये कमांडोची भूमिका असणार आहे. १५ मार्चला योधा हा चित्रपट रिलीज होणार आहे.
आणीबाणी
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर देखील आणीबाणी हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. 1975 मध्ये इंदिराजींनी लादलेल्या आणीबाणीच्या काळावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. कंगना रणौत इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे.
बडे मियाँ छोटे मियाँ
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट 2024 या नवीन वर्षात लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे.
मिस्टर अँड मिसेस माही
मिस्टर अँड मिसेस माही हा चित्रपट देखील ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव शरण शर्मा हे दोघे एका चित्रपटात काम करताना दिसणार आहेत.
चंदू चॅम्पियन
चंदू चॅम्पियन हा चित्रपट लवकरच आता बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. 14 जून 2024 रोजी हा चित्रात रिलीज होणार आहे. 83′, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटानंतर अभिनेता कार्तिक आर्यन दिग्दर्शक कबीर खानसोबत चंदू चॅम्पियन हा चित्रपट रिलीज करणार आहे.
भूल भुलैया
३ कार्तिक आर्यनचा २०२४ मध्ये भूल भुलैया ३ चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. 2024 च्या दिवाळीला भूल भुलैया ३ हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.