Youtuber Armaan Malik : मजुरी करत असणारा अरमान मलिक आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक, महिन्याची कमाई जाणून तुमचेही उडतील होश


युट्यूबर अरमान मलिक खूप लोकप्रिय आहे. त्याचे सर्व व्हिडिओ अनेकांना आवडतात. त्याच्याविषयी जाणून घेण्यास अनेकांना आवडते.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Youtuber Armaan Malik : युट्यूबर अरमान मलिकची प्रेमकहाणी सर्वांनाच माहिती आहे. तसेच त्याचे राहणीमानदेखील सर्वांनाच माहिती आहे. तो आपल्या दोन्ही पत्नी म्हणजे पायल आणि कृतिका यांच्यासह आनंदाने राहात आहे. त्याचे खासगी आयुष्य हे एखाद्या खुल्या किताबाप्रमाणे आहे.

तो त्याच्या खासगी आयुष्यात जे-जे घडत असते तो ते सर्व सोशल मीडियावर अपलोड करत असतो. अनेकांना त्याच्याबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुकता असते. अशातच अनेकांना मजुरी करत असणारा अरमान मलिक कोट्यवधी संपत्तीचा मालक कसा बनला? असा प्रश्न पडत आहे.

आठ वर्षे केली मजुरी

नुकतेच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान अरमान मलिकने त्याच्या आयुष्याशी निगडित अनेक रहस्ये उघड केली आहेत. त्यात त्याने त्याच्या बालपणाबद्दल बोलत असताना असे सांगितले की तो हरियाणाचा आहे, तो शाळेत गेला नव्हता. त्याच्या घरच्यांनी त्याला शाळेत पाठवलं की तो सकाळी शाळेत जाऊन तो दुपारी परत यायचा. तो खेळायचा, परंतु शाळेत जात नव्हता. एकदा शेजारच्या एका मुलीच्या लक्षात आल्याने तिने त्याच्या आईला सांगितले. त्यामुळे अरमान मलिकच्या वडिलांनी त्याला बेदम मारहाण करून त्याला आठ वर्षे काम करायला लावले.

आईच्या उपचारासाठी नव्हते पैसे

काही वेळाने अति मद्यपानामुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या आईला मध्यंतरी कॅन्सर झाला आणि तिच्या उपचारासाठी त्याच्याकडे 30 हजार रुपये नव्हते. त्याने नातेवाईकांकडे मदत मागितली तरी त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने त्याची आई गमावली होती.

वैवाहिक जीवन

आईच्या मृत्यूनंतर तो हरियाणा सोडून दिल्ली येथे मित्राच्या घरी काम करू लागला. त्या ठिकाणी तो महिन्याला 10 हजार रुपये कमवत होता. जेव्हा तो त्याच्या मित्राचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी जायचा त्यावेळी तिथे त्याची पायलशी भेट झाली आणि काही काळानंतर दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले. पायलचे कुटुंबीय सुरुवातीला थोडे रागावले परंतु नंतर सर्व ठीक झाले.

पहिल्या भेटीत अरमान कृतिकावर मोहित झाला होता

त्याने मुलाखतीत असेही सांगितले की त्याच्या आईने त्याला नेहमीच प्रेरित केले असून त्याची आई त्याला नेहमी म्हणायची की तुझ्या या चेहऱ्यामुळे तू एक दिवस हिरो होशील. त्याने त्याची दुसरी पत्नी कृतिकाबद्दल सांगितले की ज्यावेळी तो पहिल्यांदा तिला भेटला तेव्हा त्याच्या मुलाचा वाढदिवस होता. त्याने पहिली पत्नी पायलला कृतिकाबद्दल सांगितले, की त्याला ती आवडते. सुरुवातील पायलने ही गोष्ट गंमत म्हणून घेतली नंतर कृतिका आणि अरमानने कोर्ट मॅरेज केले होते.

अरमानने केला आत्महत्येचा प्रयत्न

अरमानच्या या निर्णयानंतर पायल आणि अरमानमध्ये बऱ्याच गोष्टी चुकल्या होत्या. या काळात, त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला असल्याने तो दोन महिने तुरुंगात होता. परंतु, बऱ्याच दिवसांनी अरमान मलिकचे संपूर्ण कुटुंब एकत्र राहत आहे.

कमाई

अरमानच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास तो यूट्यूबवरून लाखोंची कमाई करतो. त्याशिवाय तो गाणी म्हणून व्हिडिओही बनवतो. रिपोर्ट्सनुसार, तो 10 ते 15 कोटींच्या मालमत्तेचा मालक असून तो फक्त एका महिन्यात ते एकूण 3 ते 5 लाख रुपये कमवतो. तसेच तो यूट्यूब व्लॉग, म्युझिक व्हिडिओ आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून पैसे कमवतो. त्याची स्वतःची जिम असून तो चांगला कमावतो. तो अनेकदा जिमचे व्हिडिओही शेअर करत असतो .