अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- मारुती मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नेवासा तालुक्यातील सोनई येथील भाजीमंडई परिसरात घडली आहे. चोरटयांनी दानपेटीमधील नोटा पळविल्या तर चिल्लर दानपेटीतच सोडून गेले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनई येथील नदीपात्रातील ग्रामदैवत असलेल्या मारुती मंदिर येथे बुधवारी सकाळी भाविक दर्शनाला आल्यानंतर दानपेटी फुटल्याचे लक्षात आले.

काहीच वेळात घटनास्थळी ग्रामस्थ व भाविक जमा झाले. दानपेटीचे कुलूप तोडले असल्यामुळे दानपेटीतील चिल्लर मोजली असता ती 4 हजार 717 रुपये भरली. चोरटे पेटीतील फक्त नोटा घेऊन पळाले असावे असा अंदाज आहे.

मंदिराचे व्यवस्थापन पाहत असलेले ग्रामस्थ चार ते पाच महिन्यांतून एकदा दानपात्रामधील देणगी रक्कम मोजून मंदिराच्या देखभालीसाठी वापरत होते. हे दानपत्र 22 मे रोजी शेवटचे उघडले होते.

त्यावेळी 33 हजार एवढी रक्कम या दानपात्रातून होती. या अंदाजे 25 ते 30 हजाराची चोरी झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास लावण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.