अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-   श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या कुकडी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष माजी आमदार राहूल जगताप,

यांनी २१ पैकी २१ जागा बिनविरोध जिंकत निर्विवाद वर्चस्व राखत कारखान्याची निवडणूक बिनविरोध करत आपला करिष्मा दाखवून दिला आहे.

कुकडी कारखान्याच्या निवडणुकीसाठी १४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत विरोधी गटाचे दत्तात्रय पानसरे यांचे २८ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले यांच ठिकाणी विरोधी गटाचे कंबरडे मोडले.

सोमवार दि.३ जानेवारी माघारीच्या दिवशी राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घन:शाम शेलार यांच्या मदतीने आपल्या गटातील इच्छुकांचे उमेदवारी अगोदर काढून घेतले,

नंतर विरोधी गटाचे राहिले उमेदवारी मागे घेण्यासाठी आपले आडाखे बांधत डाव टाकून निवडणूक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब केला.

या निवडणुकीत १४८ उमेदवारांपैकी १२७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.