Exclusive

Ahmednagar Politics : खा सुजय विखेंविरोधात आ. निलेश लंके नव्हे तर लंके परिवारातीलच ‘ही’ व्यक्ती निवडणूक लढवणार ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Politics :- खा. सुजय विखेंविरोधात आ. लंके लोकसभेसाठी लढणार अशा चर्चा सध्या सुरूच आहेत. या चर्चांचे वादळ कुठे शांत होते न होते तोच आता नव्या चर्चानी जोर धरला आहे. सुजय विखेंच्या विरोधात आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

याचे कारण म्हणजे त्यांचे बोर्ड वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागले आहेत. “एकाच घरात दोन प्रवाह असू शकतात असं सूचक वक्तव्यही नीलेश लंके यांनी केलं त्यामुळे या चर्चांना जास्त पाठबळ मिळालं. राणीताई लंके यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

राज्यात सध्या अजित पवार गट भाजप सोबत सत्तेत आहे. मात्र, असे असले तरीही कधी निलेश लंके तर कधी राणीताई लंके यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. याविषयी बोलताना राणीताई लंके यांनी स्वत: कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत,

त्यांच्या मनात असलेल्या भावनांचा नक्कीच विचार केला जाईल. मात्र, पुढील रणनितीबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींचा विचार घेऊनच निर्णय घेऊ, असे त्या म्हणाल्या आहेत.

मोहटादेवी मार्गावरील या बॅनरवर आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांचा फोटो लावण्यात आला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये त्यांचे बॅनर फडकू लागले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आ. राम शिंदेही लोकसभेसाठी आग्रही
भाजपचे आ. राम शिंदे हे देखील लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होत. तसेच माझा पराभव विखेंमुळेच झाला असेही ते म्हणाले होते.

सध्या अहमदनगर भाजपात सर्व काही आलबेल आहे असे वाटत नाही. त्यातच शिंदे यांनी आता विखेंवर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. तसेच नुकतेच त्यांनी आ. लंके यांची मोहटादेवी येथे भेट घेत त्यांचे कौतुकही केले होते. त्यामुळे आता त्यांची आगामी चाल काय असेल याबाबत चर्चा सुरु आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24