Ahmednagar Railway Fire :- उशीरा सुटलेल्या अहमदनगर-आष्टीला रेल्वेला लागलेल्या भीषण आग प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी अहमदनगर पुणे इंटरसिटी रेल्वे कृती समितीचे हरजितसिंह वधवा व सोलापूर विभागीय सल्लागार समिती सदस्य प्रशांत मुनोत यांनी मागणी केली आहे.
या मागणीचे निवेदन तातडीने रेल्वेचे महाप्रबंधक, सोलापूर विभागीय रेल्वे प्रबंधक आणि रेल्वे मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.23 सप्टेंबर 2022 पासून बीड-परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर-आष्टी ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती.
सोमवारी ही रेल्वे आष्टी कडे जाताना सुमारे तीन तास उशिरा निघाली. परत येताना देखील ती रेल्वे उशीराच होती. दुपारी साडेतीनच्या दरम्यान सोलापूरवाडी- वाळूंज मार्गावरील रेल्वे क्रॉस जवळ असताना इंजिन शेजारील चार-पाच डब्यांना भीषण आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
या गाडीत नेहमीच प्रवासी कमी असतात. तर गाडी उशिरा सुटल्याने प्रवासी अजूनही कमी होते. जे दहा-बारा प्रवासी होते त्यांनी आग लागल्यानंतर उडी मारून स्वतःचे जीव वाचविले.
सुदैवाने कुठल ही जिवीतहानी झाली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिक, अग्निशमक दलाने प्रयत्न करुन रेल्वे डब्यांना लागलेली आग विझवली. जे
व्हापासून ही गाडी सुरू झाली, तेव्हापासून अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. यापूर्वी या रेल्वेचे दोन फेऱ्या होत होते. परंतु त्या रद्द करून एक फेरी करण्यात आली. अशा परिस्थितीमध्ये गाडी उशिरा का सुटली?, सदर गाडीला आग कस काय लागली? हा मोठा प्रश्न आहे.
गाडी आज उशिरा सुटल्याने त्यात काही घातपात करण्याचा उद्देश होता का? या सर्व प्रश्नांची उकल होण्यासाठी अहमदनगर-आष्टीला रेल्वेला लागलेल्या भीषण आग प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे वधवा व मुनोत यांनी निवेदनात म्हंटले आहे.
अहमदनगर-पुणे याला येत्या काळात मराठवाडा व विदर्भाला जोडण्यासाठी हा एक मोठा मार्ग आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. लागलेली आग ही संशयास्पद असून,
याची चौकशी होणे गरजेचे असल्याची भावना असल्याने त्यात सदरात कशी आग लागली याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी हरजितसिंह वधवा यांनी व्यक्त केली आहे.