Exclusive

Ahmednagar Ashti Train Fire : अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग ! आगीत रेल्वेचे मोठे नुकसान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Ashti Train Fire :- अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागली आहे. रेल्वे शिराडोह परिसरामध्ये असताना ही आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे. आग विझवण्याचं काम पोलीस आणि अग्निशामन दालकडून सुरु आहे, आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दोन डब्यांना लागली होती ती पुढे पाच डब्यांपर्यंत पोहोचली.आगीत रेल्वेचे तीन ते चार डब्बे जळून पूर्ण खाक झाले आहेत.आगीत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

गाडीत गर्दी नसल्याने सुदैवाने कोणालाही इजा नाही.सुदैवाने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. चार वाजता आग विझवण्यात यश आलं.

अहमदनगर लाईव्हचे Whatsapp चॅनेल जॉईन करा

रेल्वेला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी उड्या मारुन आपला जीव वाचवला आहे. आगीमुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शिराडोह परिसरात ही मोठी दुर्घटना घडली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले.

ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. या आगीमध्ये रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

अग्निशमन दल घटनास्थळी
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान आहे.

वर्षभरापूर्वीच अहमदनगर आष्टी ही रेल्वे सुरु करण्यात आली होती. नगर-बीड-परळी या मार्गावर सप्टेंबर २०२२ मध्ये नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या टप्यात रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे.

रेल्वे विद्युतीकरणासाठी काही काळ बंद करण्यात आली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेल्वेसेवा सुरू झाली होती. या रेल्वेला म्हणावा तसा प्रतिसादही मिळत नव्हता.

या मार्गावरील रेल्वेला कोणत्या कारणामुळं लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. आग कशामुळं लागली याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24