भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यावर अखेर आज मोक्का दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील शिंदेंवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी पोलिसांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आता स्वप्नील शिंदे याच्यावर मोक्का दाखल करण्यात आला आल्याची खात्रीशील माहिती मिळाली आहे.
सध्या स्वप्नील शिंदे हा अंकुश चत्तर खून प्रकरणी जेलमध्ये आहे. शहरातील एकविरा चौकात १५ जुलै २०२३ रोजी अंकुश चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात झाला होता. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. विविध स्तरावर याचे पडसाद उमटले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभिजित बुलाख, सुरज कांबळे, महेश कुऱ्हे, मिथुन धोत्रे आदींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
यातील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नगर शहरातील आणि महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हे सर्व कुख्यात आरोपी असल्याने यांच्यामुळे समाजालाही धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करावी असे निवेदनही याआधी देण्यात आले होते. तसेच पोलिसांनीही स्वप्नील शिंदेंवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आता त्याच्यावर मोक्का दाखल करण्यात आला आहे.